Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

सीमाभागात पुन्हा कन्नडसक्तीचा वरवंटा; भाषिक अल्पसंख्यांक कायद्याची पायमल्ली!

  “कन्नड अंमलबजावणी प्रगती आढावा” बैठक बेळगाव : घटनात्मक हक्क आणि भाषिक अल्पसंख्यांक कायद्याचे उल्लंघन करत सीमाभागात जाणीवपूर्वक कन्नडसक्तीच्या नावाखाली मराठी भाषिकांची पिळवणूक करण्याचे काम कर्नाटक सरकारकडून सुरू आहे. मागील 68 वर्षापासून कन्नड सक्तीच्या बडग्याखाली सीमाभाग भरडला जात असून सर्वोच्च न्यायालय, भाषिक अल्पसंख्यांक कायदा, विविध केंद्रीय समित्यांच्या सूचना व आदेशाला …

Read More »

“बेळगाव वार्ता”चा इम्पॅक्ट! आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप दुरुस्त

  बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव तसेच वडगाव स्मशानभूमी रस्ता येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्याची बातमी “बेळगाव वार्ता”ने प्रकाशित केली होती. या बातमीची तात्काळ इ स्मार्ट एलईडी स्ट्रीट कंट्रोल रूमने दखल घेत पथदीप दुरुस्त केले. आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद होते. स्थानिक …

Read More »

जोशीज पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा साजरी

  बेळगाव : मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक सेंट्रल स्कूल येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये ब्रह्माकुमारी अनिता यांनी उपस्थित राहून गुरुचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. गुरुचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असून सर्वांनी गुरूंचा आदर नेहमी राखावा असे …

Read More »

बालवीर विद्यानिकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी….

  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींच्या गीताने झाली. त्यानंतर शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर, प्रमुख अतिथी निता यल्लारी याच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना …

Read More »

शहापूर जोशीमळा आत्महत्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

  बेळगाव : शहापूर जोशीमळा येथे विष प्राशन करून तीन जणांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे शहर पोलिस आयुक्त भूषण गुलबाराव बोरसे यांनी सांगितले. गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतोष कुराडेकर, सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची …

Read More »

काजू चोरी प्रकरणी उचवडे येथील तरुणास अटक; ४२ पोती काजू, ट्रक जप्त

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी उचवडे (ता. खानापूर) येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. …

Read More »

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

  बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्यांपासून ते निकृष्ट दर्जाच्या आहारापर्यंत विविध मुद्द्यांवर आवाज उठवत कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. आज अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी फेडरेशनच्या आवाहनानुसार आणि विविध संघटनांच्या संयुक्त कृतीने पुकारलेल्या अखिल भारतीय संपाचा भाग म्हणून, बेळगाव …

Read More »

लिटल स्ट्रायकर्स चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

  बेळगाव : बेळगावमध्ये राजेश लोहार यांनी २०२१ मध्ये सुरू केलेले चित्रपट निर्मितीगृह, अस्मिता क्रिएशन्स अतिशय कमी वेळात यशाची शिढी चढत आहे. अस्मिता क्रिएशन्सचा पुढील मराठी चित्रपट अन्विता येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. चित्रपट लेखक व दिग्दर्शक संतोष सुतार यांनी पत्रकारांचे स्वागत व प्रास्ताविक केले. अस्मिता क्रिएशन्सने आता हिंदी …

Read More »

आनंदनगर दुसरा क्रॉस अंधारात; पथदीप दुरुस्तीची मागणी

  बेळगाव : आनंद नगर वडगाव दुसरा क्रॉस येथील रस्त्यावरील पथदीप मागील दोन महिन्यांपासून बंद पडल्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसह वाहनचालकांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर असल्यामुळे अंधारात या रस्त्यावरून ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. स्थानिक नागरिकांनी या …

Read More »

अद्याप एका नगरसेवकाकडून मिळकतीचा तपशील सादर नाही

  बेळगाव : महानगरपालिकेच्या विरोधी गटाच्या एका नगरसेवकाने अद्याप आपल्या मिळकतीचा तपशील सादर केलेला नाही. बेळगाव महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांच्या मिळकतीची माहिती मिळविण्यासाठी माहिती कायदेअंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अर्जधारकांना 2021 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करताना सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यात नमूद केलेली मिळकतीचा तपशील त्याचप्रमाणे मागील दोन …

Read More »