Sunday , July 26 2026
Breaking News

इस्कॉनने पैसा आणि ताकदीच्या जोरावर मानव हक्कांना तिलांजली दिली, ढोर समाजसेवा संघाचा आरोप

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी शुक्रवारपेठेतील काही ढोर समाज बांधवांना ते राहत असलेल्या घरातून रात्री 2 दोन वाजता बाहेर काढण्यात आले. इस्कॉनने पैसा, ताकदीचा वापर करून हे कृत्य केले आहे. यामुळे उच्च न्यायालय व अट्रोसिटी कायद्याचे उल्लंघन झाले असून संबंधितांवर 24 तासांत एफआयर दाखल करून त्यांच्यावर खटला चालवावा. तसेच घरातून बाहेर काढण्यात आलेल्या सदर कुटुंबीयांचे पुनर्वसन केंद्रातील जागेमध्ये स्थालांतर करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी जय भीम भारतीय हिंदू ढोर समाजसेवा संघाच्यावतीने करण्यात आली.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, घराबाहेर काढण्यात आलेले कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. मात्र इस्कॉनने उच्च न्यायालयाचा अवमान करून रात्री 2 वाजता कुटुंबीयांना बाहेर काढले आहे. तसेच अट्रॉसिटी कायद्याचेही उल्लंघन केल्याने संबंधितांवर अजामीनपात्र वॉरंट जारी करून या कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करावी. इस्कॉनने हे कृत्य करून मानव हक्कांना तिलांजली दिली आहे. जर 24 तासांत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *