Sunday , September 20 2026
Breaking News

हलशी लक्ष्मी यात्रा काळात स्टॉल लावण्यासाठी आवाहन

Spread the love

 

खानापूर : तब्बल २८ वर्षांनंतर हलशी हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात भरत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या यात्रेमुळे ग्रामस्थांसह भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे. तसेच

यात्रे दरम्यान पाळणे, झोपाळे आणि इतर मनोरंजनाची साधने लावण्यासाठी तसेच आईस्क्रीम, खाद्य पदार्थ, खेळणी, मिठाई व विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यासाठी इच्छुक व्यावसायिकांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने व्यापाऱ्यांसाठी ही चांगली संधी असल्याचेही कमिटीने नमूद केले असून सोमवार (ता. २३) ते बुधवार (ता. २५) पर्यंत कमिटीशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले असून
यात्रा परिसरात स्वच्छता, सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेची योग्य काळजी घेतली जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. सर्वांनी सहकार्य करून यात्रा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *