Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्वपूर्ण बैठक ४ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या सामान्यज्ञान स्पर्धेच्या नियोजनासाठी म्हणून रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, …

Read More »

समाजाला प्रवृत्त करून उन्नत करण्याचे काम साहित्य करते : निवृत्त प्राचार्य शामराव पाटील

  येळ्ळूर : मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याचे खरे काम येळ्ळूर गाव साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करीत आहे, व्यक्तीच्या मनामध्ये उचबंळून आलेल्या भावनांचा अविष्कार म्हणजे साहित्य होय, समाजाला प्रवृत्त करून उन्नत करण्याचे काम साहित्य करीत असते, विचारवंत समाज निर्माण करण्यासाठी साहित्य संमेलनाची गरज आहे, संमेलनाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढीला लागली पाहिजेत, …

Read More »

पायोनियर बँक चेअरमनपदी प्रदीप अष्टेकर व व्हा. चेअरमन सुवर्णा शहापूरकर यांची निवड

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी श्री. प्रदीप मारुती अष्टेकर यांची फेरनिवड करण्यात आली असून व्हॉईस चेअरमनपदी सौ. सुवर्णा राजाराम शहापूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री. प्रदीप अष्टेकर यांचे पॅनल बहुमताने निवडून आले होते त्यानंतर शुक्रवारी चेअरमन व व्हा. चेअरमन यांची निवड …

Read More »

बेळगावात २८, २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन

  बेळगाव : बेळगावात दि. २८ आणि २९ डिसेंबर रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई म्हणाले की, आजच्या तरुण पिढीला जुन्या इतिहासाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने दि. २८ व २९ डिसेंबर …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या नियोजित कार्यक्रमांना तात्पुरती स्थगिती

  बेळगाव (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे माध्यमिक विभागाचे शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी होणारे स्नेहसंमेलन व इतर सर्व शैक्षणिक उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढील तारीख नियोजना नंतर कळविण्यात येईल. उद्यापासून नेहमीप्रमाणे शाळा सुरू राहील. …

Read More »

पूंछ येथे वाहन अपघातात शहीद झालेले सुभेदार दयानंद तिरकण्णावर यांच्यावर अंत्यसंस्कार

  बेळगाव : जम्मू काश्मिरमधील पूंछ येथे झालेल्या अपघातात वीर शहीद झालेल्या सुभेदार दयानंद तिरकण्णावर यांच्यावर गुरुवारी (दि. २६) त्यांच्या मूळ गावी सांबरा लिंगायत स्मशानभूमीत शासकीय इतमामात, बंदुकीच्या फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद तिरकण्णावर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे सदस्य उपस्थित …

Read More »

जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या महामेळावा

  बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४ रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व जेष्ठ कलाकार प्रसाद पंडित, उपस्थित राहणार असून समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी व एस के ई …

Read More »

बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली, आठ प्रवाशांचा मृत्यू

  बठिंडा : प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली. या बसमध्ये किमान 50 प्रवासी असल्याची माहिती आहे. पंजाबच्या बठिंडा येथे हा भीषण अपघात झाला आहे. बठिंडाच्या जीवन सिंह …

Read More »

कंग्राळी बी.के. येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मींचा जन्मोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने देवीच्या ओटी भरण्याचा विशेष कार्यक्रम पार पडला. पहाटेपासूनच पूजेचे विधी आणि धार्मिक कार्यक्रम सुरू झाले होते. गावात वाद्यांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत पूर्णकुंभ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

काँग्रेस अधिवेशनासाठी बेळगावात आलेले खासदार रुग्णालयात दाखल

  बेळगाव : बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांच्यावर आजारपणामुळे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेले राजस्थानचे राज्यसभा सदस्य नीरज डांगे यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना …

Read More »