Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला

  बेळगाव : बेळगावात काल रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बेळगावातील चन्नम्मा सर्कलजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांमध्ये डीजेच्या तालावर नाचताना किरकोळ भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन दर्शन पाटील, सतीश पुजारी व प्रवीण गुंड्यागोळ यांच्यावर चाकू …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची बुद्धिबळ व क्रिकेट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कुमारी रोहिणी बोकनुरकर व कुमार रितेश मुचंडीकर या विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. तसेच सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये कुमारी श्रावणी पेडणेकर व कुमार गौरव पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी …

Read More »

मळेकरणी सौहार्द सहकारी संघातर्फे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडू हे प्रामाणिक व शिक्षणात सरासरीत सरस असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत मन लावून अभ्यास व खेळात रममान व्हा आणि मोठे व्हा. असा मौलिक सल्ला प्रा. अरुणा नाईक यांनी दिला. मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. येथील मळेकरणी सौहार्द …

Read More »

जायंट्स ग्रुप मेननच्या वतीने उत्कृष्ठ मुर्ती, देखावा स्पर्धा बक्षिस वितरण

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन आयोजित बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती व उत्कृष्ट देखावा बक्षीस समारंभ कपिलेश्वर येथील जायंट्स भवनच्या श्री. रामचंद्र तात्या पवार वातानुकूलित सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पाडला यावेळा विजेत्या मंडळांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला व्यासपीठावर जायंट्स ग्रुप ऑफ …

Read More »

गणेश विसर्जन मिरवणूक आज; जिल्हा प्रशासन सज्ज

  बेळगाव : बेळगावात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. लाडक्या बाप्पाचे जल्लोषी स्वागत करून दहा दिवस भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आता मंगळवारी बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस खात्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत चालते. …

Read More »

ऑटो नगर येथील नवीन जिल्हा स्टेडियमचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन

  बेळगाव : बेळगावमध्ये उभारण्यात येणारे भव्य नवीन जिल्हा स्टेडियम राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभावंतांना चमकण्यासाठी व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा बेळगावचे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज बेळगावातील ऑटोनगर येथे नवीन जिल्हा …

Read More »

विसर्जन मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त : पोलीस आयुक्त

  बेळगाव : अनंतचतुर्दशीनिमित्त उद्या होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी सर्व तयारी केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने चोख पोलीस बंदोबस्ताची सोय केली आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहर पोलीस …

Read More »

यल्लम्मा सौंदत्तीला लवकरच रेल्वे सेवा

  बेळगाव : श्री रेणुका यलम्मा सौंदत्ती तालुक्याला रेल्वे लिंक जोडण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि सर्वेक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर कारवाई करतील, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांनी सांगितले. बेळगावात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 7 ट्रेनचे उद्घाटन …

Read More »

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलची विद्यार्थिनी अक्षरा गुरव हिने 49 किलो ग्रॅम वजन गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला निवड झाली आहे. तसेच वेदांत कुगजी याने तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड …

Read More »

वि. गो. साठे गुरुजींच्या विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

  बेळगाव : मराठा मंडळ व सेंट्रल हायस्कूलचे मराठीचे प्रसिद्ध शिक्षक श्री. वि. गो. साठे गुरुजींच्या सर्व विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मराठी विद्यानिकेतनच्या प्रांगणात संपन्न झाला. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला साठे गुरुजींचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याचे स्वागत श्री. सुभाष ओऊळकर तर प्रास्ताविक श्री. मालोजी …

Read More »