बेळगाव : बेळगावमधील एका महिलेला ब्लॅकमेल करून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात भाजप नेते पृथ्वी सिंह आणि त्यांचा मुलगा जसवीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत विष प्राशन …
Read More »बेळगाव येथील श्री रुद्र केसरी मठात श्री सिद्धारू महाराज पुण्यतिथी साजरी
बेळगाव : बेळगाव लक्ष्मीटेक जवळील सैनिक नगर येथील श्री रुद्र केसरी मठात आज मंगळवार रोजी श्री सिद्धारूढ महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज पहाटेपासूनच श्री सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रुद्र केशरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परमपूज्य हरि गुरु महाराजांच्या सानिध्यात पहाटे श्रीमूर्तीला …
Read More »सदलगा येथे सिलेंडर स्फोट; एकाचा जागीच मृत्यू
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बिड, महाराष्ट्रातील सूर्यकांत शेळके (५५) यांचा मृत्यू झाला. ज्ञानोदय हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलेंडरच्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे …
Read More »रामदेव गल्ली वडगाव येथे मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम
बेळगाव : रामदेव गल्ली, माधवपूर -वडगाव येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केल्या जाणाऱ्या श्री हनुमान, श्री नागदेवता, श्री शिवलिंग व नंदी या मूर्तींची स्वाद्य मिरवणूक बुधवारी वडगाव परिसरात काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत अनेक पुरुष व मंगल कलश घेऊन सुहासिनी महिला सहभागी …
Read More »कर्जदारांकडून होणारा छळ टाळण्यासाठी महिला स्वयंसहाय्य संघातर्फे निवेदन
बेळगाव : फायनान्समधून कर्ज घेतलेल्या स्वयंसहाय्यता संघटनेच्या महिलांना कर्जदारांकडून त्रास दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गोकाक तालुक्यातील सावलगी गावातील महिलांनि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. गोकाक तालुक्यातील सावलगी गावातील स्वयंसहाय्यता संस्थेच्या महिलांनी आर्थिक छळ होत असल्याचा आरोप करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले. बचत संस्थांना दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी …
Read More »बेळगाव महानगरपालिकेची 27 ऑगस्ट रोजी तातडीची बैठक
बेळगाव : बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात जमीन गमावलेल्या बाधितांना कोट्यावधींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिल्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. बेळगाव शहरातील दोन रस्त्यांच्या कामात नुकसान झालेल्या जमीन मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बजावले आहेत. …
Read More »इस्कॉन आयोजित कृष्ण कथा महोत्सव
बेळगाव : “कलियुगात लोक संकुचित वृत्तीने अफवा पसरवितात तशीच अफवा पसरवून द्वापरयुगातही लोकांनी भगवंतांना सोडले नाही.” अशी माहिती इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बुधवारी सायंकाळी बोलताना दिली. इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्ण कथा महोत्सवातील दुसऱ्या दिवशी त्यांनी सतराजित राजा आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये स्यमंतक मनीमुळे …
Read More »कॅपिटल वन संस्थेला ३२.१८ लाख रुपयांचा नफा, सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर
बेळगाव : कॅपिटल वन या संस्थेची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री सत्यविनायक मंदिर, छत्रेवाडा अनुसरकर गल्ली येथे नुकतीच पार पडली संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेने सुमारे २० कोटी २१ लाख रुपयांच्या ठेवी १५५. ०२ कोटी रुपयांचे खेळते भांडवल …
Read More »शहापूर येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : शहापूर येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. कल्पना शंकर पाटील (वय ५१, रा. बसवण गल्ली, शहापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. कल्पना या दम्याच्या आजाराने त्रस्त होत्या. यामुळे त्यांची मानसिक स्थिती …
Read More »बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई करा : बेळगावात भाजपाची निदर्शने
बेळगाव : राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्याचे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करून कारवाई करण्यात यावी आणि मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगावात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गुरुवारी बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात छेडलेल्या आंदोलनात धरणे धरले. काँग्रेसने स्वतः चोरी करून आता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta