Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा संपन्न

  बेळगाव : दिनांक २६ जून २०२४ रोजी बेळगांवातील सदाशिव नगर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंतीच्या शुभदिनी शाहु भवन व बेळगाव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करण्यासाठी अनिल बेनके यांच्याकडून विशेष सभा घेण्यात आली. यावेळी छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीप्ती कुलकर्णी व शहर विभागाच्या पीईओ जहिदा पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ‘अ’तील ईशानी पाटील व आराध्या जाधव या विद्यार्थिनींनी राजर्षी …

Read More »

बियाणे व खते निकृष्ट दर्जाची आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल : कृषीमंत्री चेलुवनारायणस्वामी

  बेळगाव : आम्ही केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांना प्रोत्साहन देतो ज्यांनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी जे केले नाही ते करण्याचे आश्वासन दिले आहे. कृषीमंत्री चेलुवनारायणस्वामी म्हणाले की, भाजपसारखी टीका करण्याची आपल्याकडे संस्कृती नाही. ते आज बेळगाव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदाच्या मागणीबाबत बोलताना ते …

Read More »

वि. गो. साठे प्रबोधिनीतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य व वि. गो. साठे साठी मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षकांसाठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध शाळांच्या शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या. शिक्षकांनी सादर केलेल्या कविता या आशय घन होत्या शिक्षण, शेतकरी, स्त्रीमुक्ती, समानता, बालपण ,आई-वडील, …

Read More »

एंजल फाउंडेशनच्या वतीने चिकनगुनिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण

  बेळगाव : मान्सूनला सुरुवात झाली असून शहरांमध्ये ठिकठिकाणी चिकनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. हे लक्षात घेता एंजल फाउंडेशनच्या वतीने आज आलारवाड येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेमधून चिकनगुनिया आणि डेंग्यू प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. आज सोमवार दिनांक 25 जून 2024 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक …

Read More »

डेंग्यूमुळे गोजगा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

  बेळगाव : डेंग्यूमुळे गोजगा गावातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डेंग्यूमुळे निधन पावलेल्या युवकाचे नाव गणेश कल्लय्या जंगम (वय 17 रा. गोजगा) असे आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे गणेश याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत गणेश याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच त्यावर उपचार सुरू …

Read More »

दुचाकी चोरट्याला अटक; 7 दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात दुचाकींच्या चोरी प्रकरणी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विठ्ठल सदेप्पा अरेर (वय 35, रा. शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल) असे आहे. बेळगाव शहरात अलीकडे घडलेल्या विविध दुचाकी …

Read More »

राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रु. अनुदान : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बेंगळुरू : पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या, राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. आज सोमवारी विधानसौध येथे त्यांनी विधी व संसदीय कार्य व पर्यटन मंत्री एच. के. …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा सीमाभागातील नागरिकांनी उपयोग करून घ्यावा; मंगेश चिवटे

  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांची बेळगावला भेट बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सीमाभागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे. बेळगाव आणि परिसरामधून अनेक नागरिकांचे अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात प्रलंबित होते या …

Read More »

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे संभाव्य पूरस्थिती उद्भवल्यास करावयाच्या खबरदारीबाबत ग्रामपंचायतींमध्ये दर महिन्याला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची अनिवार्य बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी (२४ जून) जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. पूरपरिस्थितीचे पुरेसे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या टास्क …

Read More »