बेळगाव : बेळगाव शहरातील खानापूर रोड वरील गोवावेस जवळ असलेल्या दत्त मंदिरच्या बाजूला असणाऱ्या पेट्रोल पंपवर आज भीषण आग लागली होती. बंद असलेल्या पेट्रोल पंपवरील बाजूच्या शेडला ही आग लागली असून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी …
Read More »शरीरसौष्ठवपटू गजानन गावडे याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनने केला सत्कार
बेळगाव : उद्यमबाग येथील कारखान्यात काम करणाऱ्या गजानन गावडे या कामगाराने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टीचे दर्शन घडवीत सुवर्णपदक पटकाविले. बिकट आर्थिक परिस्थिती असूनही त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळत व्यायाम करून शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याने, त्याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. बेळगांव मायक्रो असोसिएशन उद्यमबागचे …
Read More »तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरूणाला अटक
बेळगाव : प्रेमप्रकरणातून किणये येथील तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजले. यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त इडा मार्टिन म्हणाले की, किणये गाबतीलक एका तरुणीच्या घरावर दगडफेक करून त्रास देणाऱ्या तिप्पण्णा डुकरे याला किणये गावातून अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल …
Read More »माथेफिरू तरुणाचा प्रताप; प्रेयसीच्या घराच्या फोडल्या काचा!
बेळगाव : हुबळी येथील नेहा हिरेमठ आणि अंजली अंबिगेर यांच्या हत्याकांडाचे पडसाद अद्याप ताजे असतानाच बेळगावातील किणये गावात अशाच प्रकारचे प्रेमप्रकरण घडल्याचे समोर आले आहे. किणये गावातील तरुणाने आपल्या आवडत्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता पोलीस विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. किणये गावातील तिप्पण्णा डुकरे (२७) याने …
Read More »सिलेंडर स्फोटातील वृद्ध दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू
बेळगाव : सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे शनिवार दि. १८ मे रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. २४ मे रोजी सायंकाळी खाजगी इस्पितळात दाम्पत्याचा मृत्यू झाला. शंकर गल्ली, सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय …
Read More »मराठा समाजाच्या मठाच्या ठेवींवर “त्या” बँकेचा डोळा
“त्या” बँकेच्या “दिग्गुभाई” अध्यक्षाचे प्रताप थांबता थांबेना झालेत. भ्रष्टाचाराचा कळस गाठून लाखोंची भानगड करून देखील भस्मासुराचे पोट काही भरले नाही अशी गोष्ट आता समोर आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेळगावमधील एका मठाच्या ठेवींवरती “त्या” बँकेच्या अध्यक्षाची वाईट नजर पडलेली आहे. कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष हा अमर नसतो …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 26 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये 1986 साली कन्नड सक्तीच्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक सरकारने करवलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमाभागातील 9 समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 …
Read More »शहापूरात दोन गटात हाणामारी; तणावाचे वातावरण
बेळगाव : बेळगाव शहरातील शहापूर येथील आळवण गल्ली येथे लहान मुलांच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले असून आज सायंकाळी सदर घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, लहान मुले क्रिकेट खेळत असताना किरकोळ भांडण झाले त्याचे रूपांतर हाणामारीत झाले नंतर परिसरात दगडफेक झाली. या घटनेत दोन …
Read More »मराठा सेवा संघातर्फे बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग
बेळगाव : मराठा सेवा संघ, बेळगाव यांच्यावतीने दररविवारी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत मराठा सभागृह, गणेश कॉलनी, संभाजी नगर, वडगांव येथे मराठा बाल कल्याण कक्ष प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष किरण मा. धामणेकर यांनी अधिक माहिती दिली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात …
Read More »मच्छे-वाघवडे रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती; युवा समितीचा पाठपुरावा
बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता, गेल्या २ वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta