Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

अंजली आंबिगेरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी : कोळी बेस्त समाजाचे आंदोलन

  बेळगाव : हुबळीधील अंजली आंबिगेर नामक तरुणीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज बेळगावमधील जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. बेळगाव जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून आपला रोष व्यक्त केला. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली …

Read More »

रणजित कणबरकर यांनी मिळवले टीसीएस वर्ल्ड 10 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत यश

  बेळगाव : नुकताच जनरल माणिक शॉ परेड ग्राउंड बेंगळुरू येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड 10 कि. मी. धावण्याच्या स्पर्धेत बेळगाव येथील रणजित शिवाजी कणबरकर यांनी 50 ते 54 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्ल्ड ऍथलेटिक्स मान्यताप्राप्त स्पर्धेत संपूर्ण भारतातून 10,451 धावपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत रणजीत शिवाजी …

Read More »

हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून वॉर्डबॉयचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या इसमाचा सफाई काम करताना हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुरज देवगेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी वॉर्डबॉयचे नाव असून तो विजया हॉस्पिटलचा कर्मचारी होता. वॉर्डबॉयचे काम करणाऱ्या सुरजला सफाईचे काम दिले होते. या कामाचा …

Read More »

सौ. गीता गोपाळ मुरकुटे यांचे जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून मरणोत्तर नेत्रदान

  बेळगाव : बापट गल्ली येथील रहिवासी सौ. गीता गोपाळ मुरकुटे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधून नेत्रदान करण्यासंदर्भात विचारणा केली लागलीच बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला. केएलई इस्पितळाच्या डॉ. चैत्रा …

Read More »

सांबरा परिसराला पावसाने झोडपले

  बेळगाव : हवामान खात्याने वर्तविलेल्या शक्यतेनुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेळगावमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावातही वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे फटका बसला आहे. बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात येणाऱ्या सांबरा या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मर कोसळून पडून दुचाकींचे …

Read More »

बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून

  बेळगाव : बेळगाव शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा स्क्रू ड्रायव्हरने खून केल्याची घटना महांतेश नगर पुलाजवळ घडली. बेळगाव शहरातील गांधी नगर येथील इब्राहिम गौस (२२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. इब्राहिमचे गांधी नगर येथील एका तरुणीवर प्रेम होते, आज तरुणीसोबत दुचाकी चालवणाऱ्या इब्राहिमला पाहून तरुणीच्या भावानेच त्याची हत्या केली. …

Read More »

जोशी मळा खासबाग परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

  बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून बुधवारी रात्री जोशी मळा खासबाग परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. बेळगाव शहरात चोरट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. जनतेला जीव हातात घेऊन सायंकाळच्या सुमारास फिरावे लागत आहे अशी परिस्थिती …

Read More »

एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा दिमाखात साजरा

  बिजगर्णी : कावळेवाडी गावाच्यावतीने बिजगर्णी गावचे सुपुत्र, बिजगर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांचा नागरी सत्कार सोहळा समिती हायस्कूलच्या प्रांगणात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी होते. तसेच व्यासपीठावर माजी प्राचार्य आनंद मेणसे, मालोजीराव अष्टेकर, गोपाळ गावडा, डी. एन. मिसाळे, मनोहर बेळगावकर, आप्पा जाधव, …

Read More »

हाजगोळी येथील चाळोबा तलावात बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

चंदगड (प्रतिनिधी) : पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीला गेलेल्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि. १५ मे रोजी हाजगोळी चाळोबा तलाव परिसरात घडली असून वडील सुखरूप आहेत. याबाबत समजलेली अधिक महिती अशी की, सुळगा (ता. बेळगांव) येथील फिवोना सलोमन जमूला रा. आंबेडकर गल्ली, सुळगा (वय 11) …

Read More »

“त्या” बँकेत कर्जासाठी फोफावला “एजंट”राज

  आत्तापर्यंत आपण “त्या” बँकेच्या अंतर्गत व्यवहारातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार पाहिला. अध्यक्षाने संपूर्ण बँक कशी पोखरून ठेवली आणि कर्मचारी व इतर सहकाऱ्यांची पिळवणूक कशी केली हे “बेळगाव वार्ता”ने उजेडात आणले. पण अध्यक्षांचे प्रताप एवढ्यावरच थांबतील तर कसे? बँकेतील लोकांना धरून केलेला गैरव्यवहार कमी होता की काय पैसे कमविण्यासाठी या …

Read More »