Friday , June 5 2026
Breaking News

बेळगाव

कोणत्याही परिस्थितीत महामेळावा यशस्वी करणार; युवा समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार ९ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. सदर महामेळावा यशस्वी …

Read More »

म. ए. समिती नेत्यांविरोधातील न्यायालयीन सुनावणी आता 16 जानेवारीला

  बेळगाव : 2017 मध्ये व्हॅक्सिन डेपो वर महामेळावा घेण्यात आला होता. 2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यासंदर्भात येथील टिळकवाडी पोलीस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्याविरुद्ध दाखल केलेल्या सी्सी424/2020 दाव्यासंदर्भात जे एम एफ सी 4 कोर्ट मध्ये आज पोलिसांच्या वतीने असि स्टंट सब इन्स्पेक्टर एच. एच. पमार यांची साक्ष नोंदविण्यात आली …

Read More »

प्रेम विवाह नाकारल्याच्या रागातून दोघांची हत्या

  निपाणी : प्रेम नाकारल्याचा राग मनात धरून तरुणाने प्रेम करणाऱ्या मुलीच्या आईची व तिच्या भावाची हत्या केल्याची घटना निपाणी तालुक्यातील अकोळ गावात घडली. मंगला नाईक (45) आणि प्रज्वल नाईक (18) अशी हत्या झालेल्याची नावे आहेत. निपाणी तालुक्यातील अकोळ गावातील एका घरात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने लोक हादरून गेले. रवीने …

Read More »

बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सदस्यत्व मिळविण्याची सुवर्णसंधी

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या वॉर्ड समिती सदस्य होण्यासाठी महापालिकेकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आपल्या वॉर्डचे सदस्यत्व मिळवून बेळगावच्या विकासात सहभाग घेण्याच्या सुवर्णसंधीचा आजच लाभ घ्या. बेळगाव शहराच्या विकास आणि विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असून वॉर्ड समिती सदस्य बनून शहराच्या समस्यांवर …

Read More »

सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करणारा आरोपी अटकेत

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर सोशल मीडियावर अवमानजनक भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तुमकूरमधून अटक करून बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात निंदनीय आणि अवमानजनक भाषेत टिप्पणी करणाऱ्या मोहित नरसिंहमुर्ती (38) या व्यक्तीला …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ४ जानेवारी रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत. ही स्पर्धा येत्या ४ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे संपन्न होणार …

Read More »

प्रकाश बेळगोजी, एल. डी. पाटील यांना गुंफण पुरस्कार जाहीर

  चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक यांचाही पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश सातारा : साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक आणि प्रकाश बेळगोजी यांचा …

Read More »

मराठा लाईट इन्फंन्ट्रीमध्ये अग्नीवीरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात….

  बेळगाव : 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 651 अग्नीवीर जवानांचा शानदार दीक्षांत आणि शपथविधी सोहळा बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे पार पडला. या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्नीविरानी तिरंगा ध्वज, रेजिमेंटच्या …

Read More »

हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाचा शेतकऱ्यांना धक्का

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी (दि. ३) फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला असून, या निकालाविरोधात महिनाभरात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे. हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय …

Read More »

फसवणूक झालेल्या महिलांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे मागितली दाद

  बेळगाव : बेळगावमध्ये संघाच्या कर्जाच्या जाळ्यात सापडून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील महिलांनी आज मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. संघातून कर्ज मिळवून देण्यासाठी कमिशनची मागणी करत हजारो महिलांची आर्थिक फसवणूक करत एका महिलेने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक महिलांच्या नवे सदर महिलेने …

Read More »