Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

संत मीरा शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव तर अध्यक्षस्थानी किशोर काकडे उपस्थित होते. प्रारंभी …

Read More »

बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांनी पावसाने नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. आ. राजू सेठ यांनी , बेळगाव उत्तर मतदारसंघातील बसवन कुडची, बीके कंग्राळी, कॅम्प परिसरासह अनेक भागांचा दौरा करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे पूर्णत: नुकसान …

Read More »

विजयकांत डेअरीतर्फे ‘किंग आईस्क्रीम’

  बेळगाव : बेळगावात सुरू झालेल्या आणि राज्यभर घराघरात नावारूपाला आलेल्या विजयकांत डेअरीने आता ग्राहकांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून आपल्या ग्राहकांसाठी नवीन ‘किंग आईस्क्रीम’ बाजारपेठेत दाखल केले असून नवीन किंग आईस्क्रीमचे उत्पादन बाजारात दाखल करण्यात आले आहे. विजयकांत डेअरीच्या आईस्क्रीमचे नवीन उत्पादन आज एका सोहळ्याच्या माध्यमातून दाखल करण्यात …

Read More »

मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची; माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत

  महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप खानापूर : मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही मागे पडत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य द्यावे. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत …

Read More »

श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानतर्फे कंग्राळी खुर्द येथील मराठी मॉडेल शाळेत दप्तर (बॅग) वितरण

  बेळगाव : श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठान, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे कंग्राळी खुर्द येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (बॅग) वितरण करत आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या एसडीएमसी सदस्या सौ. पौर्णिमा मोहिते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

येळ्ळूर येथील 30 वर्षाचा सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा वाद निकालात!

  बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौक (लक्ष्मी स्थळ) येथील 30 एक वर्षे वादात असलेल्या सार्वजनिक लक्ष्मी स्थळाचा आज येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने निकाल लावण्यात आला. येळ्ळूर ग्राम पंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील असताना या जागेच्या प्रश्नाला स्थानिक लोकांना नोटीसा पाठवून त्यांच्या जागेचे कागद पत्र मागून घेऊन स्थळाची पाहणी करून तेथील …

Read More »

देवाच्या नावाने प्राण्यांचा बळी देऊ नका : दयानंद स्वामीजी

  बेळगाव : पशुबळी बंदीसाठी जनजागृती केल्यामुळे वडगावच्या ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रेत पशुबळी पूर्णपणे रोखण्यात यश आले, अशी प्रतिक्रिया जागतिक प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली. बेळगाव शहरात होणाऱ्या अनेक यात्रांपैकी मोठ्या प्रमाणात भरविल्या जाणाऱ्या वडगावच्या श्री मंगाई देवीच्या यात्रेत यंदा प्रथमच पशुबळी प्रथा …

Read More »

गरजू मुलाला यंग बेळगाव फाउंडेशनची शैक्षणिक मदत!

  बेळगाव : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कष्टाळू गरजू विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक शुल्कासाठी मदत करण्यासाठी पाऊल उचलताना यंग बेळगाव फाउंडेशनने माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आवश्यक शैक्षणिक निधी आयएमए इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यंग बेळगाव फाउंडेशनच्या सदस्यांनी नुकतीच एका स्थानिक हॉटेलला भेट दिली …

Read More »

एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली!

  बेळगाव : मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ती दुथडीवरून वाहत आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करणारी जॅकवेल खराब झाली असून जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एनडीआरएफ पथकाची बोट कृष्णा नदीत उलटली. गुरुवारी सकाळी सदर घटना घडली असून सर्वजण सुरक्षित आहेत. बोट …

Read More »

काकती येथील भूखंड आणि बांधलेले घर परस्पर नावावर करून वृद्ध महिलेची फसवणूक!

  बेळगाव : कष्ट करून विकत घेतलेला भूखंड आणि बांधलेले घर एका व्यक्तीने परस्पर नावावर करून घेऊन एका वृद्ध महिलेची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. निराधार असलेली ही वृद्ध महिला सध्या हुबळी येथील सिद्धारूढ मठात वास्तव्यास आहे. उतारवयात आधार देणारी मुले नाहीत. नातवंडे नाहीत. पतीचेही निधन झाले आहे. या …

Read More »