Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

येळ्ळूरला 25 रोजी अश्वारूढ शिवमुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व विविध कार्यक्रम

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील हिंदवी स्वराज्य युवक संघ व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पंचधातूची 13 फुटी अश्वारूढ शिवमूर्ती येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकामध्ये उभारण्यात येणार आहे, अश्वारुढ शिवमुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवार (ता. 25) रोजी महाराष्ट्र चौकामध्ये होणार आहे, तत्पूर्वी रविवार (ता. 18) रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती …

Read More »

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न

  बेळगाव : जिजाऊ ब्रिगेड (राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानचा) १५-२-२०२४ रोजी दुपारी ४ वाजता सुरू झालेल्या शानदार कार्यक्रमात १२ महिलांचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला. दीपप्रज्वलन व स्वागत गीतानंतर मुख्य कार्यक्रम सुरू झाला. प्रमुख वक्त्या म्हणून सौ. सुनिता पाटणकर यांनी राजमाता जिजाऊंबद्दल आपले अभ्यासू मत मांडले. त्यानंतर दुसऱ्या वक्त्या सौ. …

Read More »

गोकुळने सीमाभागातील दूध दर पूर्ववत करावेत : युवा समितीची मागणी

  बेळगाव : बेळगाव, निपाणी भागातील बहुतांश दूध उत्पादक शेतकरी गोकुळला (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) दूध पुरवठा करतात पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सीमाभागातील म्हैशीच्या व गाईच्या खरेदी दरात कपात केली आहे, आदीच पशुखाद्य व वैरणीचे दर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमाभागातील दूध दर कमी करणे हा सीमाभागातील शेतकऱ्यावर अन्याय …

Read More »

फलोत्पादन खाते देणार अनुदान; अर्जाचे आवाहन

  बेळगाव : “फलोत्पादन विभागाकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना 2024-25 अंतर्गत अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सन 2024-25 या वर्षासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेंतर्गत, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, अंजीर, ड्रॅगन फ्रूट, पेरू, स्ट्रॉबेरी, जांभूळ, पेरू संकरित भाजीपाला आणि विविध फुल पिके यांसारखी विविध फलोत्पादन पिके घेण्यासाठी, रु. 10,000 ते रु. …

Read More »

यशस्विनी सहकारी आरोग्य रक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आदर्श सोसायटीचे आवाहन

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या यशस्विनी सहकारी आरोग्य रक्षण योजनेचा लाभ मिळवून देण्याची सुविधा येथील सुप्रसिध्द आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीने सभासदांसाठी उपलब्ध केली आहे. शहरी भागातील चार व्यक्तीच्या कुटुंबासाठी निवासी व्यक्तीकरिता एक हजार रुपये फी भरावयाची आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, आधार …

Read More »

महापौरपदी सविता कांबळे यांची बिनविरोध निवड

  उपमहापौर पदी आनंद चव्हाण बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. महापौरपद अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे तर उपमहापौरपद सर्वसामान्य वर्गासाठी आहे. भाजपकडून महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेविका सविता कांबळे आणि प्रभाग क्रमांक 35 मधील नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी अर्ज दाखल …

Read More »

विश्वकर्मा सेवा संघ महिला मंडळचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

  बेळगांव : रविवार दिनांक 11/2/2024 रोजी श्री विश्वकर्मा सेवा संघ महिला मंडळाने आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांची उस्फुर्त साथ मिळाली. उपस्थित मान्यवर मीनाताई बेनके आणि विश्वकर्मा समाजाच्या सावंत मॅडम या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मीनाताई बेनके …

Read More »

संजय पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्याची मराठा समाजाची मागणी

  बेळगाव : बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे नेते असल्याने त्यांनाच यावेळच्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामीणमधील मराठा समाजाने केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक आज कॅम्पमधील गंगाधर शानभाग हॉलमध्ये पार पडली. या बैठकीत माजी आमदार …

Read More »

अतुल शिरोले यांना भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ‘अ’ श्रेणी प्राप्त

  बेळगाव : बेळगाव येथील अतुल सुरेश शिरोले यांनी भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणारा कोचिंग कोर्स पूर्ण केला असून त्यांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यामुळे पैलवान म्हणून कुस्तीचे मैदान गाजवणारे अतुल शिरोले आता कुस्ती प्रशिक्षक म्हणून मैदानावर उतरणार आहेत. पंजाबमधील पटीयाला येथे नेताजी सुभाष चंद्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ …

Read More »

रथसप्तमी निमित्त क्रीडा भारतीतर्फे सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही क्रीडा भारती बेळगाव व पतंजली योग शिबिर यांच्यातर्फे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता रथसप्तमी निमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्राथमिक व माध्यमिक शालेय मुले- मुली, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी, योग वर्ग शारीरिक …

Read More »