Monday , September 21 2026
Breaking News

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : ध्यान मंत्रासह योगाच्या विविध पद्धतीचा समावेश ज्यामुळे उपस्थितीना योगाचे बहुयामी फायदे या विषयी सर्व समावेशक माहिती प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये तणावमुक्ती गुणधर्माचा समावेश आहे, तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि लवचिकता टिकून ठेवण्यासाठी व्यावहारिक साधने प्रदान करण्यात आली, त्यांचे दैनंदिन जीवन शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि निरोगीपणाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्धता आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त संत मीरा शाळेत योग गुरु मोहन बागेवाडी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात 10 व्या आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. या योगा दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे योग गुरु मोहन बागेवाडी, पुष्पा कोठारी,
संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांच्या हस्ते सरस्वती ओंकार भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी अलीना पठाण हिने उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला, यानंतर पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यानंतर मोहन बागेवाडी, पुष्पा कोठारी यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून विविध आसन, सूर्यनमस्कार व तणावमुक्त व्यायाम करून घेऊन विद्यार्थ्यांना निरोगी राहण्यासाठी नियमित योगा करा असा सल्ला दिला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट, शामल दड्डीकर, सुजाता पाटील, श्रद्धा मेंडके, किरण पावसकर यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *