Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!

  बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय …

Read More »

कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता

  बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मय्याप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून …

Read More »

अखंड महाराष्ट्राचा लढा सीमावासियांचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटी

  गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी भाषिक सीमाभागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा गीतामधून १८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे, सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिध्द संगीतकार शरद गोरे यांनी …

Read More »

उत्तर मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत भाजप पदाधिकाऱ्यांचे आ. राजू सेठ यांना निवेदन

  बेळगाव : भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन त्यांना यावर्षी मतदारसंघात आणलेल्या अनुदानाबाबत प्रश्न विचारले. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी विजय कोडगनूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजू सेठ यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. आपल्या माहितीप्रमाणे मतदारसंघाच्या संदर्भात एकही विकासकामे सुरू झालेली नाहीत, आमदार झाल्यानंतर …

Read More »

बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा हरिद्वार गंगा महासभेच्यावतीने विशेष सन्मान

  हरिद्वार : भारती श्रमजीवी पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव आणि बेळगावचे पत्रकार श्रीकांत काकतीकर यांचा आज शनिवारी हरिद्वार येथे श्रीगंगा महासभा वतीने विशेष सन्मानित करण्यात आले. श्रीकांत काकतीकर सह पत्नी हरिद्वार येथे आले असता भारती श्रमजीवी पत्रकार संघ उत्तराखंड पत्रकार संघ, हरिद्वार प्रेस क्लब,तसेच गंगासभेच्या वतीने आज सायंकाळी गंगा आरती …

Read More »

जायंट्स 6 फेडरेशनवर लाड, पाटील, हिरेमठ यांची निवड

  बेळगाव : राज्यातंर्गत कार्यरत असलेल्या जायंट्स फेडरेशन 6 वर जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे माजी अध्यक्ष अनंत लाड, शिवराज पाटील व शिवकुमार हिरेमठ यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युनिट डायरेक्टरपद भुषविलेले अनंत लाड यांना पुन्हा युनिट एक च्या डायरेक्टरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी तीन वेळा फेडरेशन …

Read More »

‘मतदारांना उत्तर द्या’ अभियानांतर्गत ग्रामीण भाजप मंडळचे मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन

  बेळगाव : कर्नाटक सरकारने जनतेला हमी योजनेचे आश्वासन दिले आणि सत्तेत आल्यानंतर ते राज्यात विकासकामे करत नाहीत, अर्थसंकल्पातील पैशाची चर्चा करून जनतेला आश्वासने द्यावीत पण काँग्रेस पक्षाने मोफत योजनेचे आश्वासन दिले आणि आज राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे, असा आरोप भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला. भारतीय …

Read More »

बेळगावात हरे राम.. हरे कृष्णाचा जागर!

  उद्याही विविध कार्यक्रम बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर महाराज, मॉरिशस व वृंदावनदास महाराज यांच्या हस्ते रथाची …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी तर्फे 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिन मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी प्रबोधिनीचा हा रौप्य महोत्सवी मराठी भाषा दिन आहे. या कार्यक्रमासाठी मान्यवर वक्त्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर सीमाभागातील मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या …

Read More »

येळ्ळूरमध्ये उद्या 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : चार सत्रात आयोजन, पुरस्काराचेही वितरण

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने उद्या रविवार दि. 11 रोजी सीमासत्याग्रही, स्वातंत्र्य सैनिक दिवंगत बाबुराव ठाकूर संमेलन नगरीत, श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या पटांगणात 19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली चार सत्रात हे संमेलन …

Read More »