Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात विविध संघटनांच्या वतीने सोमवारी भव्य निषेध मोर्चा

  बेळगाव : महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकासकामावर पाणी सोडण्याची वेळ बेळगाव महानगरपालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे महानगपालिकेवर ही नामुष्की ओढवली असल्याची खंत जाणकार व्यक्त करत आहेत. बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी.बी. रोड रास्ता तसेच खंजर गल्ली येथील रस्ता हे एक ताजे उदाहरण आहे. अशी अनेक …

Read More »

खादरवाडी येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश

  बेळगाव : खादरवाडी येथील जागेचा वादअखेर संपुष्टात आला. बक्कप्पाची वारी या 120 एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आले असून सदर जमीन मूळ शेतकऱ्यांच्या नावे झाल्याचे समजते. मागील दीड वर्षपासून हा जागेचा वाद सुरू होता. शेतकऱ्यांनी जमीन परत मिळविण्यासाठी विविध मार्गाने आंदोलने करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला …

Read More »

नवरात्रोत्सवासंदर्भात उद्या महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : शारदीय नवरात्र उत्सव व दसरा महोत्सव बेळगाव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या संदर्भात उद्या शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता जत्तीमठ देवस्थान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला विविध देवस्थानचे पदाधिकारी, पंच मंडळ, विविध युवक मंडळ यांची संयुक्त बैठक संपन्न …

Read More »

प्राचीन हिन्दी भाषेचा प्रत्येकाने सम्मान करावा : डॉ. मोहनदास नैमिशराय

  बेळगाव : हिंदी भाषेला खूप मोठा इतिहास आहे. हिंदी भाषेचे साहित्य समृद्ध आहे. आजच्या सोशल मीडियामुळे हिंदी भाषेची लोकप्रियता वाढत आहे. हिंदी भाषेला काका कालेलकर, सेठ गोविंददास आणि हजारी प्रसाद द्विवेदी यांनी गौरव प्राप्त करुन दिला आहे. हिंदी भाषा युनोस्कोने सुद्धा महत्व दिलेले आहे, असे प्रतिपादन नई दिल्ली येथील …

Read More »

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे राणी पार्वती देवी महाविद्यालयात स्थलांतर

  एम ए मराठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बेळगाव : इसवी सन 2010 साली स्थापन झालेले बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ हे कर्नाटकातील नामांकित विद्यापीठांपैकी एक आहे. 351 संलग्न महाविद्यालये, 21 पदव्युत्तर विभाग, एक घटक महाविद्यालय, चार स्वायत्त महाविद्यालये, डिप्लोमा कार्यक्रम, सर्टिफिकेट कोर्स, पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासन, राणी चन्नम्मा अध्यासन, …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.

Read More »

बेळगाव महापालिकेला आणखी एक धक्का; मूळ मालकाला जमीन परत

    खंजर गल्ली – जलगार गल्लीतील खाजगी जमिनीवर रस्ता बांधकामाचे प्रकरण बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या हद्दीत खासगी जमिनीवर बांधलेला रस्ता मोकळा करून मूळ मालकाला परत केल्याची आणखी एक घटना घडली आहे. पंधरा वर्षांपूर्वी बेळगावमधील खंजर गल्ली-जालगार गल्ली येथे मकबूल आगा यांच्या मालकीच्या ८०० चौरस फूट जागेवर रस्ता तयार करण्यात …

Read More »

एनपीएस रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

बेळगाव : राज्य काँग्रेस सरकारने जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे ओपीएसची अंमलबजावणी करावी, अशी मागणी एनपीएस एम्प्लॉईज युनियनचे जिल्हाध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी केली. एनपीएस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारला, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करण्याची आणि राजस्थान मॉडेलवर जुनी पेन्शन प्रणाली सुरू ठेवण्याची विनंती केली. एनपीएस योजनेमुळे …

Read More »

अथणी येथील एका तरुणावर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला

  अथणी : कांही दिवसांपूर्वी अथणी तालुक्यातील काकमरी गावात जमीन विक्रीसाठी असल्याची माहिती अथणी शहरातील शशिकांत लक्ष्मण आक्केण्णावर या तरुणाला मिळाली. त्यानुसार सदर तरुण जमीन पाहण्यासाठी गेला असता तेथील एका महिलेसह ६ अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला. तरुणाच्या मांडीवर लाथ मारण्यात आली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. …

Read More »

मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून महिलेला विहिरीत ढकलले

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील मसणाई देवस्थानाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या देवस्थानातील चांदीचे दागिने चोरीला गेले असून मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांनी महिलेला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. भारती पुजारी (रा. शिंदोळी, वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून …

Read More »