बेळगाव (वार्ता) : गणेश उत्सव काळात चार दिवसांपूर्वी प्रथमेश पिराजी कंग्राळकर (वय 13) रा. वडगाव हा बालक करंट लागून जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर बेळगाव येथील के एल ई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच्यावर शस्त्रक्रिया …
Read More »सदाशिवनगर येथून कार चोरीस!
बेळगाव : बेळगाव शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून सदाशिवनगर येथून चारचाकी कार चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदाशिवनगर येथील रहिवासी प्रसाद पाटील यांची इको सेव्हन स्टार (क्रमांक केए 22 झेड 2374) ही चारचाकी बुधवारी पहाटे 3 ते 4.30 च्या सुमारास चोरीस गेल्याचे समजते. सदर चोरट्याची छबी …
Read More »इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बेळगावच्या चिमुकलीला स्थान!
बेळगाव : इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये बेळगावच्या चिमुकलीने स्थान पटकावले आहे. विरभद्रनगर येथील रहिवासी शाबाज जमादार यांची दोन वर्षीय कन्या आयत जमादार या चिमुकलीने विविध प्रकारची फळे, फुले, वाहने, शरीराचे अवयव, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्राणी, पक्षी, वैद्यकीय उपकरणे यांची ओळख पटवून देत आपली एक नवीन ओळख बनविली आहेत. मोबाईलच्या जगात …
Read More »शिवसेनेच्या सुंदर श्रीमूर्ती स्पर्धेत पाटील मळा गणेश मंडळ प्रथम
बेळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (सीमाभाग), बेळगाव जिल्हा यांच्यावतीने आयोजित यंदाची ‘सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा -2023’ प्रथम क्रमांकासह सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ पाटील मळा, बेळगाव या मंडळाने जिंकली आहे. दरवर्षीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (सीमाभाग) बेळगाव जिल्हा यांच्यावतीने यावर्षी देखील सुंदर सार्वजनिक श्री गणेश मूर्ती स्पर्धा …
Read More »कित्तूरमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील मल्लापूर गावात एका विद्यार्थ्याचा बंदुकीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. प्रज्वल मल्लेश सुंकद (१६, रा. मल्लापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रज्वलला फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या किशन भावण्णावर, दर्शन भावण्णावर, विशाल कल्लवडर, विजय कल्लवडर, शरण भावण्णावर यांनी प्रज्वलवर शस्त्राने वार …
Read More »आईस्क्रीमचा मोदक गणरायाला अर्पण
बेळगाव (वार्ता) बेळगाव शहरात नवसाला पावणाऱ्या गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला खडक गल्ली येथील गणेशोत्सवाच्या 75 वर्षाचे औचित्य साधून बेळगाव येथील 100 वर्षाची परंपरा असलेल्या हंडे बंधूनी 21 किलोचा आईस्क्रीम मोदक साकारला व तो खडक गल्लीच्या राजाला अर्पण केला. बेळगावातील हंडे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील यशराज व हृषीकेश यांच्या संकल्पनेतून या …
Read More »मराठी भाषिकांसाठी ५% जागा आरक्षित ठेवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे म. ए. समितीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सरकारी नोकर भरतीसाठी सध्या पात्र उमेदवारांची माहिती मागविण्यात येत आहे. अनेक मराठी उमेदवार यासाठी अर्ज करीत आहेत. या पदासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या कारणास्तव सीमाभागातील मराठी भाषिक उमेदवारांचे अर्ज नाकारले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व पदांकरिता …
Read More »जनतेची गैरसोय टाळण्यासाठी जनता दर्शन : प्रकाश हुक्केरी
बेळगाव : जनतेला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बंगळुरूला पायपीट करावी लागू नये यासाठी स्थानिक पातळीवर जनता दर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. असे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी आम. प्रकाश हुक्केरी यांनी केले. आज मंगळवारी (२६ सप्टेंबर) शहरातील केपीटीसीएल कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित जनता दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकार्यांच्या …
Read More »हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी, जनता दर्शनात निवेदन; आश्वासन
बेळगाव : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास न्यावी, असे निवेदन संस्थेतर्फे विकास कलघटगी यांनी आज जनता दर्शन कार्यक्रमात दिले. आमदार राजू सेठ व जिल्हाधिकारी नितेश …
Read More »माध्यमिक फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, सेंटपॉल्स शाळेला विजेतेपद
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा व सेंटपॉल बेळगाव शहराने विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सर्वोदय स्कूल खानापूरने महावीर भगवान बेळगांव तालुक्याचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या बेला फर्नाडीस एक गोल केला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta