बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विधानसभेत जवळ मालवाहू ट्रकमध्ये प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवलेला गोव्याहून अन्यत्र नेण्यात येणारा महागडा अवैध दारू साठा जप्त केल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अबकारी खात्याने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव येथे सापडलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा अवैध दारू साठा आहे. याबाबतची …
Read More »रामतीर्थ नगर परिसरात आढळले नवजात मृत अर्भक!
बेळगाव : रामतीर्थ नगर येथील एका खुल्या जागेत नवजात मृत पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बेळगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगाव शहरातील रामतीर्थ नगर येथील भरवस्तीत आज सकाळी पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती …
Read More »शिवबसव नगर येथील हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश; दोघांना अटक
बेळगाव : शिवबसव नगर येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीतील शिवबसव नगर येथे नागराज इराप्पा गाडीवड्डर या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडाने ठेचून खून केला होता. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले …
Read More »टँकरच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
बेळगाव : बेळगाव- खानापूर रोडवर रस्ता ओलांडताना पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उद्यमबाग बेंम्को समोर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जैरूनबी मोहम्मदसाब चौधरी (वय 74) असे सदर महिलेचे नाव असून ती राजाराम नगर, उद्यमबाग येथे राहणारी आहे. दुकानाला जाण्यासाठी रस्ता ओलांडताना सदर अपघात …
Read More »न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेच्या कुस्ती पटुंनी जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगण येथे या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थिनी ऋतुजा गुरव 45 किलो वजनी गट, …
Read More »रयत गल्ली येथील समिधा बिर्जे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : फक्त शेतकरी कुळातच नव्हे तर हालगा-मच्छे बायपास अन्याय विरोधातल्या लढ्यात या मुलीसह पूर्ण कुटूंबाने झोकून देत आंदोलन केले होते. इतकेच काय तर समिधाच्या आईने आपली शेती कदापी देणार नाही म्हणून पोलिस फौजफाट्यासह आलेले शासकीय अधिकारी, महामार्ग ठेकेदाराना विरोध केला होता. अधिकाऱ्यांनी त्यांच्या उभ्या पिकात जेसीबी घालतानां पाहून …
Read More »हॉकी बेळगावच्या वतीने हॉकी साहित्य वितरण
बेळगाव : हॉकी बेळगावच्या वतीने आज खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना हॉकी साहित्याचे वितरण करण्यात आले. हा वितरण सोहळा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी ताराराणी हायस्कूलच्या प्रांगणात मुख्याध्यापक राहुल जाधव, शिक्षिका अश्विनी पाटील व विद्यालयाच्या सुमारे 50 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हॉकी बेळगावचे …
Read More »राज्य रयत मोर्चाद्वारे सरकारविरोधात 8 सप्टेंबर रोजी आंदोलन
बेळगाव : शेतकरी विरोधी धोरणाविरोधात 8 सप्टेंबर रोजी सर्व तालुका केंद्रांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजप रयत मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी, जनविरोधी धोरणाच्या विरोधात आम्ही याआधी जिल्हास्तरावर आंदोलन केले आहे. आता सर्व शेतकऱ्यांना संघटित करून तालुका केंद्रावर …
Read More »बेळगाव श्री गणेश फेस्टिवलचे महिलांच्या स्पर्धांनी उद्घाटन
बेळगाव : बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवलचे आज शनिवारी महिलांच्या स्पर्धा आयोजनाद्वारे शानदार उद्घाटन झाले. शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश फेस्टिवलचे, श्री राजमाता सोसायटीच्या चेअरमन सौ. मनोरमा देसाई यांच्यासह, भक्ती महिला सोसायटीच्या चेअरमन ज्योती अगरवाल, डॉक्टर सौ. …
Read More »येळ्ळूर विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेचे यश
बेळगाव : दि. 1/9/2023 रोजी मराठी प्राथमिक शाळा राजहंसगड येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर व लोवर प्राथमिक शाळेच्या विधार्थांनी दैदिप्यमान यश संपादन केले. त्यात पहिली ते सातवीमध्ये भक्तीगीत प्रथम शिवण्या मुचंडी तर दुर्वा पाटील द्वितीय. कन्नड कंठ पाठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta