Sunday , July 26 2026
Breaking News

२ आंतरराज्य चोरट्यांना अटक; ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या दोन आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी आदी ठिकाणच्या चोऱ्या आणि घरफोडीच्या मालिकेतील आरोपींबाबत एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त एसपी एम. वेणुगोपाल आणि डीवायएसपी आर. बी. बसरगी आणि रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली. बैलहोंगल सीपीआय व्ही. बी. सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक रचण्यात आले होते. या पथकाने वैज्ञानिक तपास साधनांचा वापर करून दोन आरोपींना महाराष्ट्र राज्यात अटक करण्यात आली आहे.

याबाबत आज पत्रकारांना माहिती देताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, दीपक सुदेश पवार, वय 22 वर्षे आणि राहुल गंगाधर जाधव, वय 21 वर्षे दोघेही राहणार करत मनस्कुल झोपडपट्टी, पोस्ट कुंभार पिंपळगाव, तालुका गुणसंगी, जिल्हा जालना महाराष्ट्र राज्य यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी, हुक्केरी आणि संकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 15 लाख रुपयांचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील आणखी एक सहआरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, असे एसपी गुळेद यांनी सांगितले. आमच्या तपास पथकाला जिल्ह्यातील दहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. जे आरोपी सापडले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकानात चोरलेल्या दागिन्यांची विक्री केली आहे. आमची टीम अजूनही एका मुख्य आरोपीचा शोध घेत आहे. बैलहोंगल येथे 5, नेसरगी येथे 3 गुन्हे, हुक्केरी येथे 1, संकेश्वरमध्ये 1 गुन्हे दाखल आहेत. आमच्या विभागाने एक टीम तयार केली आहे. बिट कर्मचारी रात्रीची गस्त घालून रात्रीच्या चोर्यांना आळा घालण्यासाठी मोठी काळजी घेतली आहे.साखळी चोरीच्या घटना सध्या थांबल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 10 प्रकरणांचे रहस्य उकलण्यात यश मिळवलेल्या आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो असे एसपी गुळेद यांनी सांगितले.

बैलहोंगल सीपीआय पी. व्ही. सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली, या प्रकरणाचा यशस्वी तपास केल्याबद्दल नेसरगी पीएसआय मल्लिकार्जुन बिरादार, बैलहोंगल पीएसआय गुरुराज कलबुर्गी आणि पोलीस कर्मचारी विठ्ठल दोड्डोनप्पनवर, शंकर मेनसीनकाई, व्ही. एस. यरगट्टीमठ, यू. एच. पुजेरी, चेतन बड्डी, जे. आर. मळगली, ए. के. डोंबारा, मुत्तू मुरगोड, एस. एम. अंगडी, आणि बेळगाव तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कनवर आणि सचिन पाटील यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *