Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

गदगजवळ झालेल्या कार अपघातात बेळगावच्या दोघांचा मृत्यू

  बेळगाव : कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे महामार्गा शेजारील शौचालयाला जाऊन धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावच्या दोघांचा जण जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गदग शहराबाहेरील कळसापूर क्रॉस नजीक हुबळी -होस्पेट राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांची नावे सिद्धय्या पाटील आणि बाबू तारीहाळ …

Read More »

बेळगावात शिवसेनेतर्फे ११ व्या स्मृतिदिनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  बेळगाव : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनी बेळगाव खडेबाजार, कृष्णज्योती अपार्टमेंटमधील कार्यालयात आज शिवसेनेतर्फे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजूकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’परत या, परत या, बाळासाहेब …

Read More »

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळीनी घेतली दुष्काळ व्यवस्थापन बैठक

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होताच टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीने स्वत:चा टँकर खरेदी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. दुष्काळ व्यवस्थापनाबाबत सुवर्ण विधान सौध येथे आयोजित लोकप्रतिनिधी व …

Read More »

मच्छे- वाघवडे रस्त्याची दुरुस्ती लवकरच : म. ए. युवा समितीच्या मागणीची दखल

  बेळगाव : मच्छे-वाघवडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस तसेच परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. गेल्या वर्षभरापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता, पावसाळ्यात तर या रस्त्याची स्थिती आणखी बिकट झाली होती, परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष केले होते. स्थानिक अधिकारी …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात दंत व नेत्र तपासणी शिबिर

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात एक दिवसाचे दंत व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समिती बेळगावचे सचिव श्री. प्रकाश नंदीहळी हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमास धर्मस्थळ ट्रस्ट बेळगावचे डायरेक्टर श्री. सतीश …

Read More »

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

  बेळगाव : हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अकरावा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. १७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस मराठी माणूस कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. तसंच बाळासाहेब …

Read More »

आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन देमट्टी यांचे निधन

  बेळगाव : शहापूर गाडे मार्ग येथील रहिवासी, बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी तसेच बेळगावच्या आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन शट्टप्पा देमट्टी (वय 63) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेली अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी मनपा कर्मचारी संघटना, मनपा कर्मचारी सोसायटी …

Read More »

वडगाव चावडी, जनावरांचा दवाखाना समस्यांच्या विळख्यात

  बेळगाव : वडगाव चावडी आणि जनावरांचा दवाखाना एकाच इमारतीत आहे. सदर इमारत मनपाच्या अखत्यारीत येते. त्याठिकाणी जनावरांचा दवाखाना आणि तलाठी कार्यालय आहे. मात्र या इमारतीत वीज जोडणी नाही की जनावरांना लागणारी औषधे ठेवण्यासाठी फ्रीजची सोय नाही. वारंवार मागणी करून देखील संबंधित लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी देखील या मागणीकडे दुर्लक्ष …

Read More »

महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून बेळगावच्या पत्रकारांचा अपमान

  बेळगाव : पत्रकार विरोधी वक्तव्य केल्याने बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात बेळगावातील पत्रकारांनी ठराव केला असून याची तक्रार प्रदेश काँग्रेस आणि एआयसीसीकडे करणार आहेत. महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावचे पत्रकार नालायक असल्याचं अत्यंत निंदनीय आणि अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी कन्नड …

Read More »

खानापुरात उद्यापासून शस्त्र प्रदर्शन

  खानापूर : खानापुर येथील शिव -स्वराज जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटना निमित्त फाउंडेशनतर्फे लोकमान्य भवन येथे १७ ते १९ नोव्हेंबर पर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनाबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असुन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह इतर मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शस्त्र …

Read More »