Monday , September 21 2026
Breaking News

आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन देमट्टी यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : शहापूर गाडे मार्ग येथील रहिवासी, बेळगाव महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी तसेच बेळगावच्या आंबेडकर चळवळीतील सच्चा कार्यकर्ता अर्जुन शट्टप्पा देमट्टी (वय 63) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेली अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी मनपा कर्मचारी संघटना, मनपा कर्मचारी सोसायटी अध्यक्षपदाची धुरा ही सांभाळली होती. बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात अर्जुन देमट्टी यांचा सिंहाचा वाटा होता. बेळगाव परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने भाग असे. बेळगाव परिसरातील आंबेडकर चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. विविध जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, विवाहित कन्या, एक भाऊ असा परिवार आहे. अर्जुन देमट्टी यांच्या निधनामुळे बेळगाव परिसरात सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

दुपारी 3 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *