बेळगाव : बेळगावातील 450 खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना,वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता आणि उपजीविका मंत्री डॉ. शरण प्रकाश आर. पाटील यांनी केली आहे. शहरातील बिम्स रुग्णालयाच्या आवारातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. 04) आयोजित बिम्स प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय …
Read More »दिवाळी सणासाठी वायव्य परिवहन महामंडळातर्फे ५०० हून अधिक विशेष बस व्यवस्था
हुबळी : वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांचा दिवाळी सण साजरा करण्यासाठी आणि उत्सवानंतर परतणाऱ्या सार्वजनिक प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील आणि राज्याबाहेरून विविध ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 500 हून अधिक विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. ११ नोव्हेंबरला शनिवार व रविवार, १२ तारखेला नरक चतुर्दशी, १३ तारखेला सोमवार अमावसे, लक्ष्मीपूजन आणि …
Read More »ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीत केदारनाथमध्ये सीमावासीयांची घोषणाबाजी, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!
बद्रीनाथ- उत्तराखंड : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. तिथे आज सकाळी ते केदारनाथाच्या दर्शनाला पोहोचले. यावेळी त्यांच्यासमोर बेळगावमधल्या सीमाभागातील सीमावासीयांनी घोषणाबाजी केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा सीमावासीयांनी केली. तसंच उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काहीच काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत …
Read More »कॅन्डल मोर्चा स्थगित
बेळगाव : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे -पाटील यांनी उभे केलेले आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बेळगाव येथे कॅन्डल मोर्चा घेण्यात येणार होता परंतु महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाची दिशा 24 डिसेंबर नंतर ठरणार असल्यामुळे हा कॅन्डल मोर्चा काही काळ स्थगित ठेवून …
Read More »मार्कंडेय साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ
बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा विधीवत पूजनाने आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. मार्कंडेय साखर कारखाना स्थळी आज सकाळी कारखान्याचे चेअरमन तानाजीराव पाटील यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे विधिवत पूजन करून ऊस गाळपासाठी टाकण्याद्वारे गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सवाद्य पार पडलेल्या …
Read More »बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेळगाव : सहकार क्षेत्रातील अग्रेसर दि. बेळगाव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा सत्कार समारंभ ताशिलदार गल्ली येथील सोसायटीच्या सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजाराम सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दि. सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत अमृतराव हसबे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर व्हाईस चेअरमन सौ. सुरेखा मेलगे, …
Read More »गर्भलिंग तपासणी प्रकरणी यश हॉस्पिटलवर छापा
बेळगाव : महाद्वार रोड बेळगांव येथील यश हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भलिंग तपासणीचा प्रकार उधळून लावण्यात आला असून हॉस्पिटल मधील रुग्ण नोंदणी पुस्तक, गर्भवती महिलांचे स्कॅनिंग रिपोर्ट ताब्यात घेतले असून स्कॅनिंग रूमला टाळे ठोकण्यात आले आहेत. बेळगावच्या उपविभागीय अधिकारी आणि आरोग्य विभागाने संयुक्तिक छापा टाकून सदर गैरप्रकार उघडकीस आणला आहे. सदर …
Read More »भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात अडथळा
बेळगाव : भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात अडथळा आहे. भ्रष्टाचार कमी असलेल्या देशांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. देशातील न्यायव्यवस्था, कार्यपालिका आणि विधिमंडळात पारदर्शकता बदलून भ्रष्टाचार निर्मूलन शक्य आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी म्हणाले की, यातून देशाच्या सुवर्णकाळाची सुरुवात होणार आहे. जिल्हा …
Read More »रेल्वे आणि विजेचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला सीआयटीयूचा विरोध
बेळगाव : केंद्र सरकारच्या रेल्वे आणि विजेचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाविरोधात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सीआयटीयूच्या बेळगाव जिल्हा समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले. शेतकऱ्यांना आपल्या देशाचा कणा म्हटले जाते. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची रक्तवाहिनी आहे, मोठ्या लोकसंख्येच्या आर्थिक आणि …
Read More »नेहरूनगरात गटाराचे सांडपाणी रस्त्यावर : जनतेतून तीव्र नाराजी
बेळगाव : नेहरूनगर येथील बसवणा मंदिर नजीक गेल्या काही दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे . वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना तसेच परिसरातील दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या समस्येकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नेहरू नगरातील या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta