बेळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महानगरपालिकेत आज बुधवारी विकास आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्री जारकीहोळी यांनी महानगरपालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजना अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर सौंदर्यकरणाचे कामही सुरू आहे याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती …
Read More »नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य : मंत्री सतीश जारकीहोळी
विकास आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस बेळगाव : स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी; पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट; स्मशानभूमी विकास, पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आहे. याबाबत सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश …
Read More »तालुका समिती याचा खुलासा करणार का?
चौगुले कुटुंबियांचा मनोहर किणेकर, अॅड. एम. जी. पाटील यांना सवाल बेळगाव : तालुका म. ए. समितीच्या 26 मे रोजी झालेल्या बैठकीत एस. एल. चौगुले, सरोजनी चौगुले आणि अशोक चौगुले यांच्यावर बडतर्फीच्या कारवाईचा ठराव करण्यात आला. त्यामुळे चौगुले कुटुंबियांनी आमच्यावर कशाच्या आधारावर आणि कोणाच्या सांगण्यावर कारवाई करण्यात आली, असा सवाल तालुका …
Read More »पालकमंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज आढावा बैठक
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर स्मार्ट सिटी, बुडा आणि पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेणार आहेत. महापौरांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या सभेत नगरसेवकांनी प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेषत: भाजपचे सदस्य नाराज असून आज दोन्ही मंत्र्यांच्या …
Read More »अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक
बेळगाव : जिल्ह्यात बियाणे वाटपाचे काम सुरू झाले असून बियाणे वितरण केंद्राच्या आवारात बियाणे उपलब्धता, किंमत व साठा याची स्पष्ट माहिती मोठ्या फ्लेक्सद्वारे प्रदर्शित करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात मंगळवारी (६ जून) आयोजित अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत …
Read More »नियती फौंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्याला आर्थिक मदत
बेळगाव : नियती फौंडेशनतर्फे गरजुंना नेहमीच मदतीचा हात दिला जातो. यावर्षी देखील एका होतकरू विद्यार्थी समर्थ नवलेला बीकॉम.च्या अभ्यासक्रमासाठी नियती फौंडेशनतर्फे आर्थिक मदत करण्यात आली आहे. सदर युवक गरीब कुटुंबातील आहे. त्याची शिक्षण घेण्याची धडपड पाहून नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. समीर सरनोबत यांनी मदतीचा हात …
Read More »एम. के. हुबळीनजीक ट्रक पुलावरून खाली कोसळला!
बेळगाव : पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पुलावरून सरळ खाली कोसळल्याची घटना एम. के. हुबळीनजीक घडली आहे. अपघात इतका भयानक होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालक मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक चिक्कमंगळूरवरून महाराष्ट्रामध्ये लाकूड वाहतूक करत होता. दरम्यान मलप्रभा नदीनजीक …
Read More »शिवरायांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना हिंदुस्तान तसेच अन्य संघटनांतर्फे आज मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. एसपीएम रोड शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये आज सकाळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »रिंगरोडसाठी एक इंचही जमीन देणार नाही : येळ्ळूरच्या शेतकऱ्यांचा निर्धार
बेळगाव : येळ्ळूरच्या शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमोर रिंग रोडसाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या सुपीक जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून तसे स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या आवाहनानुसार बेळगाव रिंगरोडसाठी जमीन संपादित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांकडून रिंग रोडबाबत मत जाणून घेऊन आक्षेप नोंदवून घेतले जात आहेत. त्या अनुषंगाने आज …
Read More »बेळगाव महापालिकेच्या आढावा बैठकीत समस्यांच्या मुद्यांवर वादळी चर्चा
बेळगाव : महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागातील अनेक समस्या अजूनही जैसे थेच आहेत. त्याचप्रमाणे शहरातील नालेसफाईचे काम रखडण्यालाही सर्वस्वी महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असल्याची टीका नगरसेवकांनी केली. सोमवारी महापालिका सभागृहात महापौरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत शहरातील समस्यांच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. यावेळी संतप्त नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta