नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन करुन १०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा आरोपी जयेश उर्फ शाकीर पुजारीला नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, माझी या प्रकरणी नागपुरातील चौकशी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा बेळगाव कारागृहात पाठविण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका …
Read More »आनंदनगर वडगाव भागात नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
वडगाव : दुसरा क्रॉस आनंद नगर वडगाव या ठिकाणी नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड या ठिकाणी होत आहे, गेल्या आठ दिवसापासून आनंद नगर दुसरा क्रॉस येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात …
Read More »‘बुडा’ कार्यक्षेत्राचा विस्तार होणार; २८ गावांच्या समावेशाबाबत फेरविचार?
राज्यातील सत्तांतरामुळे नव्याने चर्चेची शक्यता बेळगाव : बेळगाव तालुक्यातील २८ गावांचा ‘बुडा’ कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने या प्रस्तावावर फेरविचार होणार असल्याची माहिती मिळाली. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना २०२० मध्ये ‘बुडा’ प्रशासनाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आधी २७ गावांचा बुडा …
Read More »दैव बलवत्तर म्हणून नागाच्या दंशापासून बालिका बचावली
हालगा येथील घटना; सर्पमित्राने पकडले बेळगाव : साप म्हटले की, भीती वाटल्यावाचून राहत नाही. सर्पाचा दंश हा जीवघेणा “असतो, हे प्रत्येकाच्या मनात ठसलेले असल्याने सापाबद्दल दया, ‘सहानुभूती वाटणे दुरापास्तच. साप हा माणसाचा शत्रू नसून मित्र आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे विज्ञानवाद्यांनी सिध्द करून दाखविले आहे. पण, रस्त्यावर, घरात किंवा …
Read More »कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना उद्या अभिवादन!
बेळगाव : 1 जून 1986 साली कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात झालेल्या हुतात्मा अभिवादन करण्यासाठी उद्या गुरुवार दि. 1 जून रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. प्रति वर्षाप्रमाणे सीमाभागातील मराठी बांधव 1 जून रोजी या हुतात्मा अभिवादन गांभीर्याने पाळतात, यावर्षीही 1 जून रोजी या …
Read More »प्रा. शंकर जाधव यांना आरसीयुची डॉक्टरेट जाहीर
बेळगाव : मूळचे इनाम बडस गावचे रहिवासी असलेले कवि, लेखक, पत्रकार प्रा. शंकर जाधव यांना बेळगावच्या राणी चेन्नम्मा विद्यापीठाची (आरसीयु) डॉक्टरेट अर्थात विद्यावाचस्पती पदवी जाहिर झाली आहे. “1960 नंतरच्या कोकणातील लेखिकांच्या साहित्याचा अभ्यास” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे व्यासंगी प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांचे …
Read More »पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतीला प्राधान्य
बेळगाव : पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे सर्वप्रथम उद्यापासूनच जिल्ह्यातील सर्व आमदारांना माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा पुरवठा करण्याचे काम हाती घेतले जावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी सकाळी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक पार …
Read More »बेळगावमध्ये 12 जूनपासून ‘नाट्यमहोत्सव -2023’
बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘नाट्यमहोत्सव जून -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रामदेवच्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या कन्नड भवन येथे या नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाणार …
Read More »मोदगाजवळ प्रशिक्षण विमान कोसळले!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळून पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत. बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा-बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. ही बाब कळताच …
Read More »बडतर्फीचा निर्णय एकतर्फी; चौकशीविनाच वरिष्ठांनी कारवाई केल्याचा आरोप
बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. निकालानंतर पंधरा दिवसांनी झालेल्या तालुका म. ए. समिती बैठकीत समितीविरोधी प्रचार केल्याचा ठपका ठेवत तिघांना बडतर्फ केल्याचा ठराव करण्यात आला. तो सर्वांसमोर वाचूनही दाखवण्यात आला. पण, आपल्यावर एकतर्फी कारवाई झाली आहे. चौकशी न करताच मनमानी प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta