बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या कामात कोणत्याही प्रकारची कुचराई होऊ नये यासाठी निवडणूक कर्तव्य काळजीपूर्वक व हुशारीने पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्व नोडल अधिकारी व पथकांनी तयारी करावी, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. सुवर्ण विधान सौधच्या सभागृहात शनिवारी …
Read More »राजहंसगड दुग्धाभिषेक महाप्रसाद तयारीला वेग
येळ्ळूर : राजहंसगड श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक आणि महाप्रसाद तयारीला वेग आला असून येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. आज सकाळी कणबर्गी येथील जागृत देवस्थान सिध्देश्वर मंदिरातील महाप्रसादासाठी लागणाऱ्या मोठमोठ्या वीसेक हजार क्षमतेच्या चार कावली त्याबरोबर महाप्रसादासाठी लागणारी सर्व भांडी साहित्य माजी महापौर शिवाजी सुंठकर …
Read More »मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवा; शिवसेना युवा सेनेतर्फे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी (ता. १९) राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी युवा सैनिकांनी व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करावे, असे आवाहन शिवसेना युवासेनेतर्फे करण्यात आले. राजहंसगडावरील दुग्धाभिषेक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. १६) युवासेनेच्या कार्यकर्त्यांची समर्थनगरात …
Read More »दुग्धाभिषेक सोहळा यशस्वी करण्याचा वाघवडेवासियांचा निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने येथे रविवार दि 19 मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर होणाऱ्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचा निर्धार वाघवडे (ता. जि. बेळगाव) येथे आयोजित जनजागृती सभेमध्ये व्यक्त करण्यात आला. येळ्ळूर राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्या …
Read More »राजहंसगड छ. शिवाजी महाराज मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी व्हा; तालुका समितीचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या …
Read More »दुग्धाभिषेक सोहळ्याची प्रशासनाला पूर्वकल्पना
बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून नियमानुसार या सोहळ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सोहळ्याची माहिती देणारे निवेदन सादर केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावरील …
Read More »हलगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे
बेळगाव : हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे यांचा विजय झाला आहे. सागर कामाण्णाचे यांनी तवनाप्पा पायाक्का यांचा पराभव केला. निवडणूक अधिकारी म्हणून हेस्कॉम अधिकारी वैशाली तुडवेकर यांनी काम पहिले. सागर कामाण्णाचे यांना १० तर तवनाप्पा पायाक्का यांना ८ मते पडली आहेत. यावेळी ग्रामपंचायत …
Read More »जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उचगावच्या सौ. भाविकाराणी होनगेकर
बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक व सहकार क्षेत्रातील एक अग्रेसर असलेल्या बेळगाव येथील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उचगावच्या सौ. भाविकाराणी जीवनराज होनगेकर यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या व …
Read More »येळ्ळूर विभाग समितीकडून दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी पंचगंगेचे जल
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येळ्ळूर राजहंसगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा रविवार दिनांक 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर सात नद्यांच्या जलाशयाने जलाभिषेक करून महाराजांना मुजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने आज येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सकाळी सात वाजता येळ्ळूरहून कोल्हापूर येथील …
Read More »बेळगावच्या श्री ज्योतिर्लिंग मंदिराला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची खास भेट
बेळगाव : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या कार्यालयीन कर्मचारी वर्गाने काल बुधवारी शिवबसवनगर बेळगाव येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराला खास सदिच्छा भेट देऊन मंदिराचे लाकडी काम आणि शिस्तबद्ध नियोजनाची प्रशंसा केली. शिवबसवनगर येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराची वास्तू, गाभारा वगैरेचे लाकडी काम, नवरंग आदींची मंदिराला भेट देणाऱ्या भक्तमंडळींकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta