Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

मंगाईनगर रस्त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाई देवस्थानाकडून रस्त्यावर केल्या जाणाऱ्या बांधकामामुळे मंगाईनगर रहिवाशांचा आपल्या घरी ये -जा करण्याचा मार्ग बंद झाला आहे. तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे आणि रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी मंगाईनगर, वडगावच्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगाईनगर वडगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख …

Read More »

शरद पवार यांना दिलेल्या धमकीचा मध्यवर्ती म. ए. समितीकडून तीव्र शब्दात निषेध

बेळगाव : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सीमा भागातील मराठी भाषिक जनतेचे आधार स्तंभ श्री. शरदरावजी पवार यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या थोर परंपरेला काळीमा फासणारी ही घटना आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती याचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे. …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे अभिनंदन!

  बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटून नूतन मंत्रिपदासाठी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट, राकेश परीट, दयानंद उघाडे, …

Read More »

महात्मा गांधी वाचनालय आणि सामाजिक संस्थेतर्फे गुणगौरव सोहळा

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे आयोजिलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक निलेश शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रामपंचायतच्या सदस्या रेणू गावडे, प्रमुख वक्त्या म्हणून टिळकवाडी बेळगाव …

Read More »

बेनकनहळ्ळीत बोगस डॉक्टरवर छापा; दवाखाना सील

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात बोगस डॉक्टरवर छापा टाकून त्याचा दवाखाना सील करण्यात आला. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश बी कोणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश कोणी आणि जिल्हा आयुष अधिकार्‍यांच्या पथकाने आज राजू एम. पाटील …

Read More »

हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करा : हिंदू संघटनांची मागणी

  बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी पोलिसांकडे केली आहे. या संदर्भात हिंदू संघटनांच्या प्रमुखांनी आज एसीपी नारायण बरमनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोल्हापुरात घडलेल्या घटनेप्रमाणे बेळगावात समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतमधील समस्या सोडविण्याची मागणी

  येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दिनांक 7 जून 2023 रोजी नूतन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना गायरान जागा, जलजीवन मिशन योजना आणि केइबी संदर्भात तसेच गावांतील रस्ते, गटारी आणि इतर विकास कामामध्येही लक्ष घालुन विकासकामांना चालना देण्याच्या संदर्भात येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा कार्यालयात त्यांची भेट …

Read More »

कोल्हापुरात तणाव; बेळगावात सतर्कतेच्या सूचना

  बेळगाव : कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर बेळगाव पोलीस लक्ष ठेवून आहेत. कोल्हापुरातील लोण बेळगावात पसरू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. शहर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे निमित्ताने कोल्हापुरात काही समाजकंटकानी सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवले …

Read More »

पालकमंत्र्यांना वॉर्ड क्रमांक 50 मधील विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर

  बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेत विकास आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दक्षिण विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या महिला कार्यकर्त्या शिवानी पाटील वॉर्ड क्रमांक 50 मधील विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर केले. सदर निवेदनात वॉर्ड क्र. ५० मधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांची …

Read More »

बुडा आयुक्तांविरोधात एफआरआय दाखल करण्याचा आदेश

  बेळगाव :  बेळगाव विकास प्राधिकरणांतर्गत झालेल्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे बेळगाव जिल्हा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याविरोधात खाजगी तक्रार केली होती. या तक्रारी अन्वये तपास सुरु असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मोहन प्रभू …

Read More »