Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक; ट्रॅक्टर चालक जागीच ठार

  बेळगाव : भरधाव टिप्परची ट्रॅक्टरला धडक बसल्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष महावीर हुडेद (वय वर्षे 23) राहणार विजयनगर हलगा असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 7 च्या सुमारास सदर अपघात राष्ट्रीय महामार्गाजवळील खमकारट्टी गावाजवळ घडला आहे. संतोष हुडेद हा आपला …

Read More »

‘संतमीरा’च्या स्नेहसंमेलनाला डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित

  बेळगाव : अनगोळ येथील संतमीरा शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध स्पर्धा, मान्यवरांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत होत्या. अनगोळ येथील संतमीरा शाळेतर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 20 जानेवारीला आयोजित करण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमाला उद्योजिका प्रिया पुराणिक, …

Read More »

सेवंतीभाई शहा यांचे निधन

  शहापूर मुक्तीधाम येथे सकाळी अंत्यसंस्कार बेळगाव : मंगळवार पेठ. टिळकवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक सेवंतीभाई चतुरदास शहा (वय ८६) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता अंत्ययात्रा निघणार असून शहापूर मुक्तीधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार …

Read More »

चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक लाच घेताना ताब्यात

  चिकोडी : चिकोडी उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तानी छापा टाकून 30 हजार लाच घेताना चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक यांना ताब्यात घेतले आहे. बेळगाव लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली लोकायुक्त पथकाने चिकोडी उपनिबंधक कार्यालयावर अचानक छापा टाकला. यावेळी जमीन खाते बदल करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेत असताना चिकोडी वरिष्ठ उपनिबंधक शिवराजू …

Read More »

संभाजी महाराजांच्या स्मारकाचा 28 जानेवारीला लोकार्पण सोहळा

    बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून येत्या शनिवारी (28 जानेवारी) स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. शनिवार सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत राज्याभिषेक व …

Read More »

इच्छुकांकडून फक्त महिला मतदारांनाच प्राधान्य!

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वत्र इच्छुकांची मोर्चेबांधणी पाहायला मिळत आहे. ग्रामीण मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची स्वतःला उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस लागली आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार महिला मतदारांना वेगवेगळी प्रलोभने देऊन स्वतःकडे आकर्षित करताना दिसत आहेत. कुकर मिक्सर किंवा इतर संसारउपयोगी साहित्य देऊन महिला मतदारांना आकर्षित करत …

Read More »

हारुगेरीजवळ गोळीबार; एक जण जखमी

  रायबाग : नातेवाईकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन मारामारीत झाले असून नंतर गोळीबार करण्यात आला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मारामारीत आरोपी श्रीशैल पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायबाग तालुक्यातील हारुगेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावसुद्दी गावात गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने …

Read More »

बुडत्याला “समिती”चा टेकू!

  बेळगाव : नामधारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांचे नाव कार्यकर्ते विरहित नेते म्हणून राजकीय वर्तुळात चर्चिले जाते. प्रकाश शिरोळकरांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बरेच कार्यकर्ते शिवसेनेपासून फारकत घेऊन वेगळे झाले आहेत व त्यांनी आपली वेगळी अशी चूल मांडली आहे. शिवसैनिक सोबत नसलेल्या शिरोळकरांनी उसणे अवसान आणण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळीना …

Read More »

येळ्ळूरच्या नेताजी मल्टीपर्पज सोसायटीची प्रगती कौतुकास्पद : दिगंबर पवार

  वडगाव येथे स्थलांतरित नूतन शाखेचे उद्घाटन येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीने सहकारात एक वेगळाच आदर्श निर्माण केला असून, या संस्थेने केलेली प्रगती खरोखरच कौतुकास्पद अशीच आहे. येळ्ळूर सारख्या खेड्यातुन पुढे येत या संस्थेने लोकांसमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. या संस्थेने केवळ नफा एके नफा …

Read More »

मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात आयक्यूएसी आणि एन.एस.एस.घटका तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी पदी नँक समन्वय अधिकारी प्रा. आर. एम. तेली उपस्थित होते तर अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी …

Read More »