Wednesday , April 22 2026
Breaking News

म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांचा विजयनगर परिसरात झंझावात प्रचार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची विजयनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोष स्वागत करून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला.
सुरवातीला विजयनगर येथे आर एम चौगुले यांचा भगवा झेंडा बांधुन पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजयनगर. शिवगिरी कॉलनी. पाईपलाईन रोड. रक्षक कॉलनी. डिफेन्स कॉलनी. लक्ष्मीनगर. देसाई कॉलनी. आदी भागांमध्ये त्यांची पदयात्रा करण्यात आली. यावेळी ठीक ठिकाणी त्यांची आरती ओवाळून स्वागत करण्यात आले तर पुष्पहार घालून त्यांचा स्वागत करून त्यांना भरघोस पाठिंबा देण्यात आला.

शिवाजी बाडीवाले. विजय कोलेकर. मधुकर चलवेटकर. शंकर गरडे, सुरेश बोकडे. तात्यासाहेब भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विजयनगर परिसरातील सर्व नागरिकांनी आर. एम चौगुले यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. घरोघरी त्यांना आरती ओवाळून त्यांना पाठिंबा दिला तर सर्व युवक मंडळांनी गल्लोगल्ली फटाट्याच्या आतिश बाजी करून आर. एम चौगुले यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. यावेळी पदयात्रेमध्ये शिवाजी अतिवाडकर, मनोज पावशे, प्रकाश पाटील, बळवंत झेंडे, बाळकृष्ण दफेदार, पी एस पाटील, वाय एस. चौगुले, के. के मरुचे, सुरेश रेडेकर, पियुष हावळ आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *