Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

रोहित पवार यांनी घेतली वडगाव येथील समिती कार्यकर्त्यांची भेट

  बेळगाव : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात प्रवेशबंदी केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार हे गनिमी कावा करत बेळगावात काल मंगळवारी सकाळी दाखल झाले. येळ्ळूर येथील भेटीदरम्यान त्यांनी वडगाव येथील समिती कार्यकर्त्यांची भेट घेतली व संवाद साधला व येथील मराठी जनतेच्या भावना समजून घेतल्या. यावेळी समिती …

Read More »

महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार!

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार समितीच्या बैठकीत करण्यात आला. महामेळाव्यासंदर्भात आज मंगळवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या अध्यक्षांना आपले …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर बैठक; सचिव पी. हेमलता घेतली माहिती

  बेळगाव : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. आज मंगळवारी (13 डिसेंबर) बेळगावातील सुवर्णासौधला पी. हेमलता यांनी भेट दिली आणि विविध व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुवर्णविधान सौधतील फर्निचर, साऊंड सिस्टीम, इंटरनेट सिस्टीम, पिण्याचे पाणी, …

Read More »

शहर म. ए. समितीची बैठक उद्या

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बुधवार दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक युवक यांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More »

आमदार रोहित पवार यांचा बेळगाव दौरा

बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकार सीमावाद तापवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होत असताना, महाराष्ट्राला एकत्र यावेच लागेल. सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्मितेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज बेळगाव बोलताना केले आहे. सीमावाद तापला असताना …

Read More »

रोहित पवारांची येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट

  बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, महाराष्ट्र कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र विधायक रोहित पवार यांनी दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून रोहित पवार यांनी अभिवादन केले आणि त्यानंतर येळ्ळूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. येळ्ळूर …

Read More »

सीमावादानंतर पहिल्यांदाच शिंदे-बोम्माई यांची भेट

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत चालला आहे. सीमावाद खटला सर्वोच्च न्यायालयात निर्णायक वळणावर आला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जतसह 40 गावांवर दावा केलाय. सीमावादावरून शिंदे सरकारला विरोधकांनी घेरले होते. आज कर्नाटकचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अहमदाबाद विमानतळावर भेट झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समोर आली आहे. …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संतमीरा शाळेला दुहेरी मुकुट

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुलींचे फुटबॉल संघाने विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादन केला तर मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. केदारपुर ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या 33 व्या राष्ट्रीय विद्याभारती फुटबॉल स्पर्धेत …

Read More »

म. ए. समितीचा महामेळावा हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार : विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 19 रोजी आयोजित करण्यात आलेला महामेळावा हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे, असे मत विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी व्यक्त केले. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथील सुवर्णसौधमध्ये 19 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते सुवर्णसौधमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक उद्या

  बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य, बेळगाव शहर म. ए. समिती आणि बेळगाव तालुका म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 13 डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. तरी शहर, तालुका, मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे …

Read More »