म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार बेळगाव : दिनांक 24 मार्च रोजी बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. सरकार विविध कारणास्तव बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगुंदी येथील शेतकरी मेळावा …
Read More »जय-पराजयाचा विचार सोडून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे : किरण जाधव
बेळगाव : स्पर्धेत जय- पराजय ही दुय्यम बाब असून स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना सादर करणे महत्त्वाचे आहे, असे भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले. कन्नड महिला संघ, साहित्य कला वेदिकेच्यावतीने रविवारी टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे फाटकानजिकच्या वरेरकर नाट्य भवन …
Read More »शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी गांभीर्याने
बेळगाव : श्री धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक बेळगाव सकाळी 09.30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त पुजन करण्यात आले. सुरुवात प्रेरणा मंत्राने करण्यात आली. बेळगाव सीमाभाग शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि संघटक तानाजी पावशे, मंगेश नागोजीचे यांच्या हस्ते पुष्पहार घालून …
Read More »राजहंसगडावर राबविली समिती नेत्यांनी स्वच्छता मोहीम!
बेळगाव : काल झालेल्या दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी बेळगांव परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. हा दिमाखदार सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे गड परिसरात कचरा निर्माण झाला होता. म. ए. समितीच्या माध्यमातून आज सोमवारी गड परिसरात स्वच्छता माहीम राबविण्यात आली होती. …
Read More »बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक उद्या
बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीला दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवभक्तांनी सहकार केले त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बेळगाव तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक १९ …
Read More »कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मुग गिळून गप्प
राहुल गांधींची बेळगावच्या जाहिर सभेत घणाघाती टीका बेळगाव : राज्यातील विकास कामात 40% कमिशन घेतले जात असल्याचा आरोप कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन ने केला आहे. या संदर्भात कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे. मात्र त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अद्यापही दिलेले नाही. कर्नाटकातील भ्रष्टाचारावर पंतप्रधान मूग …
Read More »कुद्रेमानी गावात अधिकाऱ्यांचा छापा; मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या टिपीन बॉक्ससह साहित्य जप्त…!!
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील मतदारांना वाटण्यासाठी भाजप नेत्याच्या घरी जमा करण्यात आलेल्या टिपीन बॉक्ससह काही भेटवस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची घटना घडली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावातील भाजप नेत्याच्या घरी मतदारांसाठी टिपीन बॉक्ससह काही साहित्य जमा करून ठेवण्यात आले होते. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती …
Read More »अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरमुळे एका तरुणाचा बळी
बेळगाव : बेळगावच्या महांतेशनगर सेक्टर क्रमांक 12 मध्ये लव्ह डेल खासगी शाळेजवळ बांधलेल्या अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरने एका तरुणाचा बळी घेतला आहे. माहितीनुसार काल संध्याकाळीच हा स्पीड ब्रेकर बांधण्यात आला होता. उंच गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर काही तासातचं काल रात्री उशिरा महांतेशनगर येथील रहिवासी 23 वर्षीय प्रतीक फकीरप्पा होंगल हा दुचाकीवरून …
Read More »लेडी लायन्स ग्रुपच्या वतीने रयतेच्या रणरागिनींचा सत्कार
बेळगाव : बेळगाव येथील लेडी लायन्स ग्रुपच्या वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून जगाचा पोशिंदा म्हणून लोकांचे पोट भरण्यासाठी शेतात आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या कष्टकरी महिलांचा सत्कार करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला. आनंदवाडीतील शेवंता पाटील, उर्मिला चव्हाण, सुभद्रा मास्तमर्डी, अनुसया पाटील, तुळसाबाई ढवळे, रंजना मुचंडी, सुंदराबाई …
Read More »राजहंसगड शिवमूर्ती शुद्धीकरण सोहळ्यास हजारोंची उपस्थिती
बेळगाव : राजहंसगडावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरु करून राष्ट्रीय पक्षांनी शिवरायांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांनी शिवमूर्तीचे जलाभिषेक व दुग्धाभिषेक, विधिवत पूजन करून शुद्धीकरण केले. यावेळी म. ए. समितीशी एकनिष्ठ राहून आदेश पाळण्याची शपथ शिवरायांना स्मरून घेण्यात आली. गेल्या 15-20 दिवसांपासून भाजप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta