बेळगाव : बापट गल्ली येथील रहिवासी सौ. गीता गोपाळ मुरकुटे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधून नेत्रदान करण्यासंदर्भात विचारणा केली लागलीच बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला.
केएलई इस्पितळाच्या डॉ. चैत्रा शेखर आणि डॉ. रोहन सिन्हा यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी मदन बामणे आणि अजित कोकणे यांनी नेत्रहीनांना दृष्टी देण्याचे पुण्य कार्य केल्याबद्दल मुरकुटे कुटुंबीयांचे आभार मानले.
त्यांच्या पश्चात पती, दोन कर्ते चिरंजीव, कन्या, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे
सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. म. ए. समितीचे कार्यकर्ते आणि जायंट्स मेनचे सभासद सुनिल आणि अनिल मुरकुटे यांच्या त्या आई होत.