Thursday , November 21 2024
Breaking News

आजरा

चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. चंदगडमधील भाजप नेते शिवाजी पाटील यांनी मेळावा घेत उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. या मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी …

Read More »

चंदगडच्या पट्ट्याने खेचला १६०० कोटींचा निधी : उपमुख्यमंत्री अजित पवार

  आमदार राजेश पाटील याना पुन्हा संधी द्या दुप्पट निधी देतो तेऊरवाडी (एस के पाटील) : कर्नाटक व महाराष्ट्राच्या सिमेला लागून असणारा शेवटचा महाराष्ट्रातील मतदार संघ म्हणजे चंदगड. या मतदार संघात सहकार, शिक्षण आणि आरोग्य याचा सर्वांगिण विकास १६०० कोटी रुपये आणून आमदार राजेश पाटील यानी पहिल्याच टर्ममध्ये पूर्ण केला. …

Read More »

प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी ता. आजरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

  आजरा : प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी ता. आजरा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. वैभव कांबळे होते. यावेळी तालुक्यातील पहिलाच उपक्रम म्हणून आदर्श व गुणवंत विद्यार्थी हा पुरस्कार कुमारी प्रांजल विजय सावेकर या विद्यार्थिनीला देण्यात आला. त्यावेळी सर्व पालकांनी या उपक्रमाचे …

Read More »

मतदारसंघाच्या विकासासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी; भाजप नेते शिवाजीराव पाटील यांची भावनिक साद

  चंदगड : निवडणूक लढवण्यासाठी सेवा संस्था, दूध संस्था घराणेशाही यांचे पाठबळ लागते, पण माझ्याकडे काहीच नसताना माझ्यावर विश्वास दाखवला. मतदार संघाच्या विकासासाठी आपण मला पुन्हा एकदा संधी द्यावी, मतदार संघाचा कायापालट करू असे आश्वासन भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणूक पक्ष किंवा अपक्ष निवडणूक लढवणारच आणि …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना २६ व २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर

  कोल्हापूर (जिमाका) :  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६ व २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील शाळा २६ व २७ जुलै …

Read More »

कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान

  कोल्हापूर : स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काल (मंगळवार) चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान, मतमोजणी चार जूनला होणार आहे. चंदगड शहरातील …

Read More »

आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू

  धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर काळाचा घाला कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला असून हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. धुणं धुण्यासाठी कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार …

Read More »

डोंगराळ व दुर्गम चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

  चंदगड येथील विविध विकास कामांचे कोनशिला अनावरण कोल्हापूर (जिमाका) : चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे 850 कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी 5 कोटीचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी 5-5 कोटींचा निधी …

Read More »

दौलत (अथर्व)च्या महारोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद; मानसिंग खोराटे

  चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता अथर्वच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी दौलत कारखाना कार्यस्थळावर घेण्यात आला. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन चेअरमन मानसिंग खोराटे, सुनिल गुट्टे, भाजपा नेते शिवाजीराव पाटील, मा.राज्य मंत्री भरमूआण्णा पाटील, ऍड. संतोष मळवीकर, शांतारामबापू पाटील, सचिन बलाळ, नामदेव पाटील …

Read More »

कुदनूर येथे तीन कारखान्यांना भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

  कुदनूर : नूतन वर्ष २०२३ च्या आरंभीच कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार व बंधू यांच्या तीन कारखान्यांना भीषण आग लागली. सिद्धेश्वर सॉ मिल, सिद्धेश्वर ऑईल मिल आणि शिवराज फॅब्रिकेटर्स आग लागलेल्या कारखान्यांची नावे आहेत. या आगीत कारखान्यात बांधलेल्या दोन गोट व तीन दुचाकी जळून खाक झाल्या. आगीचे …

Read More »