शिरोली एमआयडीसी : पुणे- बेंगळुर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बायोगॅस घेवून जाणाऱ्या ट्रकमधील अचानक गॅस गळती सुरु झाली. यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली. गॅस हवेत पसरून दुर्गंधी पसरली तर स्फोट होईल या भितीने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. गॅसच्या दुर्गंधीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज काही …
Read More »कोल्हापुरात शाळेच्या बसवर दगडफेक, दसरा चौकात अज्ञातांकडून हल्ला
कोल्हापूर : कोल्हापुरात काही अज्ञात व्यक्तींकडून शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा …
Read More »अमोल येडगे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याता आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच जागेवरील अमोल येडगे कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी असतील. वादग्रस्त भूमिकेमुळे राहुल रेखावार चर्चेत राहुल रेखावार कोल्हापूर जिल्हाधिकारी असताना …
Read More »गडकोट मोहिमेदरम्यान दरीत कोसळून हुपरीतील तरूणाचा मृत्यू
हुपरी : भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमेदरम्यान एक (२५ वर्षीय) तरुण दरीत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये हुपरी ता. हातकणंगले येथील तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सागर पांडुरंग वाईगडे (वय २५, रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी …
Read More »अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
शहराच्या विकासासाठी मंदिर परिसर विकास आराखड्याला सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांचे आश्वासन कोल्हापूर (जिमाका): श्री अंबाबाई मंदिर हे चिरंतन टिकणारे मंदिर आहे. मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देवून कोल्हापूर शहर आणि येणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, …
Read More »कोल्हापुरात घोडा मैदान स्पर्धेवेळी घोड्यांपुढे धावणाऱ्या जीपचा भीषण अपघात, 8 ते 10 जण जखमी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती. अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले 8 ते 10 जण थेट जीपखाली आले. त्यामुळे या …
Read More »उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड जाळले
कोल्हापूर : बेळगावात कन्नड नामफलकांच्या सक्तीचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. बेळगाव महाराष्ट्राच्या हक्काचे, ते भविष्यात महाराष्ट्रातच येणार असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड उखडून जाळून टाकले. कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात दुकाने, आस्थापनांना कन्नड भाषेतील नामफलक अनिवार्य केले आहेत. मात्र सरकारने कारवाई …
Read More »नुतन वर्षाची सुरवात शिवमय होणार….
छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’ प्रयोगाचे मोफत; दि. 5, 6 व 7 जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजन महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी यावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर (जिमाक) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन …
Read More »मराठा आरक्षण धास्ती; कोल्हापूर जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत मनाई आदेश
कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी. प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे …
Read More »कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
गोवा-मुंबई बस उलटली कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा (बस) भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta