Sunday , September 20 2026
Breaking News

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाचा स्नेह मेळावा!

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाचा स्नेह मेळावा व कार्यकारिणी निवडीसंदर्भात कोल्हापूर सहकार बोर्ड येथील सभागृहात मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मिडीया राज्य उपाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे व निमंत्रक अनिल धुपदाळे, विठ्ठल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रमुख पत्रकार उपस्थित होते.

लवकरच परिषदच्या कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाची कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे, असे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सांगितले, तर सातारा येथे राज्यातील डिजिटल मिडीयाचे अधिवेशन घेण्यासाठी नियोजन केले जाणार आहे, असेही म्हटले.
यावेळी परिषदचे अध्यक्ष शरद पाबळे, जेष्ठ किरण नाईक, डिजिटल मिडीयाचे राज्य उपाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी तर शेवटी आभार प्रविण सुर्यवंशी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *