यड्राव (जि. कोल्हापूर) : यड्राव येथील रेणुका नगरमध्ये पटांगणात खेळणाऱ्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केले. भटक्या कुत्र्यांनी तिचे डोके, मान व डाव्या हाताच्या दंडाचे लचके तोडून गंभीर जखमी केले. मनस्वी अक्षय गायकवाड (वय दीड वर्षे) असे तिचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास यड्राव येथील रेणुकानगर दक्षिण भागात …
Read More »शिवसेनेतर्फे कोगनोळीत महामार्गावर रास्तारोको
आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस कोल्हापुरात आमने-सामने
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी कोल्हापूर शहरातील शाहुपूरी भागात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस आमने- सामने आले. याची जोरदार चर्चा रंगली आहे.मुख्यमंत्री …
Read More »नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथे पूर परिस्थिती पाहणी प्रसंगी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथील …
Read More »पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता
कोल्हापूर : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने …
Read More »वाह रें पठ्या ….. पुरावर स्वार होऊन केला १३ गावांचा विजपुरवठा सुरळीत
नेसरी येथील हर्षची कामगिरी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी परिसरात महापूर म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. यावेळी तर घटप्रभा नदिने पुराचा विक्रम केल्याने परिसरातील अनेक गावांचा विजपुरवठा खंडीत झाला होता. पण नेसरी ता. गडहिंग्लज विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचे ठायी तत्पर…विजवितरण म्हणत महापुरातही धाडस दाखवत पुरातून पोहत …
Read More »‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’
कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »नूतन जिल्हाधिकार्यांनी स्विकारला पदभार
कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. श्री. रेखावार यांनी ऑगस्ट 2012 ते ऑगस्ट 2013 या काळात सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. गडचिरोली येथील इटापल्ली येथे ऑगस्ट 2013 ते फेब्रुवारी 2014मध्ये …
Read More »कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी आज (सोमवार) बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध करण्यात महाविकास आघाडीला यश आले. भाजपाने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; मात्र ऐनवेळी माघार घेतली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे या निवडणुकीची उत्सुकता …
Read More »आंबोली धबधब्याला पर्यटकांची वाढतीये गर्दी…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील): चंदगड तालुक्यापासून काही ठराविक अंतरावर असणाऱ्या व सावंतवाडी हद्दीमधे असणाऱ्या आंबोली येथील धबधब्याला आता पावसाळी हंगामामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा या ठिकाणी होत असून निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य या धबधब्याला लाभलेले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पर्यटक या पर्यटनस्थळाचा आनंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta