मिरज : सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. खासगी सावकार …
Read More »एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे. पी. नड्डांची तातडीची बैठक!
नवी दिल्ली : राज्य सरकारमध्ये मंत्री आणि शिवसेनेतील महत्त्वाचे नेते असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेत मोठी बंडखोरी होणार असल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असतानाच शिवसेनेचे अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमवीर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात …
Read More »“विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क नाही, पण…”; एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच आता एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याच्या बातम्या …
Read More »शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल
मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार …
Read More »भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप विजयी.. भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा कात्रजचा घाट
मुंबई : अत्यंत चुरशीने रंगलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 …
Read More »म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा संशयास्पद मृत्यू
मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील …
Read More »विधानपरिषद निवडणूक; मतदानाच्या परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. त्यांच्यासोबतच १०० कोटींच्या गैरव्यवहारात नाव आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील मतदानासाठी कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यसभेला मतदान …
Read More »विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये खरी लढत, कोण मारणार बाजी?
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास …
Read More »आजरा पोलीसांची तत्परता, कोटीच्या गुन्ह्यातील हरीयाणाच्या दरोडेखोरांना केले अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापरचे पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाब राज्यातील डेराबसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जागा खरेदी विक्री व्यवसायाच्या ऑफिसवर दरोडा टाकुन व तेथील एका इसमावर गोळ्या घालून गंभीर जखमी करुन एक कोटी रुपये रक्कम लुटुन नेले. त्यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करत चौघांना पोलिसांनी …
Read More »महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने चंदगडच्या पत्रकाराना रेनकोटांचे वाटप
चंदगड (एस. के. पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदगड पत्रकारांना तालुक्यातील मनसेचे कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पुढाकाराने छत्र्यांचे व रेनकोटांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील यांनी पत्रकार हा वेळी अवेळी वृतसंकलनासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta