Thursday , November 21 2024
Breaking News

महाराष्ट्र

शाळा 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु ठेवा

इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांची मागणी कोल्हापूर (वार्ता) : कोरोनाच्या सुरवातीपासून दोन वेळा केलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दोन वर्षे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अन्य आस्थापनाना दिलेल्या सवलतीप्रमाणे कोरोना नियमांची आवश्यक ती …

Read More »

सामाजिक मुल्यांची रूजवण करते ती खरी कविता : शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे

चंदगड (वार्ता) : कविता गायन करणे व सादर करणे ही एक कला आहे. ही कला फक्त संवेदनशील मनाची जोड असलेल्या लोकांनाचं उमगते. कवितेत दुसर्‍याच्या मनात परिवर्तन करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन एम. टी. कांबळे यांनी केले. ते साहित्य रत्नं व माय मराठी अध्यापक संघ चंदगड आयोजित काव्य वाचन स्पर्धेच्या निमित्ताने …

Read More »

तुर्केवाडीला ५ कोटींचा निधी देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

तुर्केवाडी येथील श्री ब्रह्मलिंग देवालय वास्तुशांती व श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सांगता तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तुर्केवाडी ( ता. चंदगड ) येथील श्री ब्रह्मलिंग देवालयाला पर्यटन ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच ५ कोटीचा निधी मंदिरासाठी देण्याचे आश्वासन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तुर्केवाडी …

Read More »

चंदगड तालुक्यावर झालेला अन्याय दूर करणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

यशवंतनगर येथे केडीसीसीचा प्रचार मेळावा संपन्न तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगडच्या लाल मातिचा सुगंध कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला येतो. गेल्या काही निवडणूकात चंदगड तालुक्यावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय आगामी काही दिवसात दूर करून चंदगडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहाणार असल्याचे विचार महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त …

Read More »

’चंदगड’ मधील किल्ले, धार्मिक व नैसर्गिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यास सक्षम : प्रांताधिकारी वाघमोडे

पारगड परिसराची अधिकार्‍यांकडून पाहणी, चंदगड पत्रकार संघाचा पुढाकार चंदगड (श्रीकांत पाटील) : चंदगड मधील ऐतिहासिक गडकोट, नैसर्गिक साधन संपत्ती, धार्मिक स्थळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असून तालुक्यातील अशा ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. …

Read More »

उच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावले, मुजोर दौलत विश्वस्थ प्रशासनावर कारवाईची मागणी

चंदगड (वार्ता) : प्रा. नागेंद्र जाधव हे दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण हलकर्णी महाविद्यालयात इतिहास विषयाचा अधिव्याख्याता म्हणून 21 जून 2002 पासून कार्यरत आहेत. आपल्या सेवेला नियमित मान्यता मिळावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात 2010 ते 2013 या काळात एकूण चार रिट याचिका दाखल केल्या आहेत. त्यातील High Court, Mumbai W.P. …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीवरील बंदीची चर्चा; शिवसेनेचं कर्नाटक सरकारला थेट आव्हान!

मुंबई : बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार घडल्यानंतर बेळगावसहीत सीमाभागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केलं. मात्र या आंदोलनानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यासंदर्भात कर्नाटक सरकार विचार करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच यासंदर्भात शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत …

Read More »

उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन; सत्ताधारी आणि विरोधकांची खलबतं

मुंबई : उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक …

Read More »

भाजप आमदारांनी रामाची, विठोबाची जागा लाटली; नवाब मलिकांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्यास भाजपचे मंत्री जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना …

Read More »

मराठी भाषकांचा आवाज कदापी दबणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर बेळगाव येथे झालेला भ्याड शाई हल्ला अत्यंत निंदनीय असून त्याचा तीव्र निषेध करतो. दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला हा संपूर्ण मराठी अस्मितेवर जाणीवपूर्वक, सुनियोजित केलेला हल्ला आहे. या संतापजनक घटनेमुळे मराठी भाषक चळवळीवर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही, उलट मराठीभाषक चळवळ आणखी …

Read More »