Thursday , November 21 2024
Breaking News

महाराष्ट्र

हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टींविरोधात सुजित मिणचेकर, चेतन नरके या दोन नावांची चर्चा

  कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून हातकंणगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. चेतन नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत …

Read More »

महाविकास आघाडीची ‘मातोश्री’वर निर्णायक बैठक, जागावाटपावर तोडगा निघणार?

  मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार खलबतं, महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजच सुटणार?

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या प्रचंड खलबतं सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …

Read More »

लोकसभेला मराठा व्होट बँकची ताकद दाखवणार : मनोज जरांगे-पाटील

  अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर आज मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे. “बैठकीला उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाने आपआपल्या गावात …

Read More »

हसूसासगिरीच्या कर्तृत्ववान शांताबाईंना अखेर गडहिंग्लज अंनिसने केले जटामुक्त

  गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चाळीस वर्षांपूर्वी पती निधनानंतर कशाचीही तमा न बाळगता लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करणाऱ्या श्रीमती शांताबाई यांच्या डोक्यावरील जटेचा भार अंनिसने केला हलका. नाभिक समाजातील श्रीमती शांताबाई यादव वय वर्षे 72 रा.हसुरसासगिरी ता. गडहिंग्लज यांचे पती श्रीपती यादव यांचे 40 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आणि शांताबाई …

Read More »

राजकीय जाहिरात प्रमाणिकरण, पेड न्यूज आणि फेक न्यूजबाबत माध्यम कक्षाची स्थापना

  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून माध्यम कक्षाची पाहणी कोल्हापूर (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ 47 व 48 करिता माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. या कक्षामध्ये …

Read More »

जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची आज बैठक

  मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय बैठकांचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, आज, गुरुवारच्या बैठकीत जागावाटप सूत्रावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीत सहभागाचे स्पष्ट संकेत दिलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेचीही आज बैठक …

Read More »

महायुतीत जागावाटपाचा पेच, तोडगा काढण्यासाठी नेते दिल्ली दरबारी, आतातरी तिढा सुटणार?

  मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता दिल्लीतच सुटणार आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्यानं हा पेच आता दिल्लीतच सुटणार अशी चिन्ह दिसत आहेत. लवकरच महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक पार पडणार आहे. भाजप …

Read More »

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप

  मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय …

Read More »

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात; चार ठार

  पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू …

Read More »