Friday , November 22 2024
Breaking News

महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ देवरवाडी येथे साखळी उपोषणास प्रारंभ

  शिनोळी : मराठा आरक्षण प्रश्र्नी सुरू असलेल्या न्याय मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांच्या अभूतपूर्व उपोषणाला पाठबळ देण्यासाठी देवरवाडी ता. चंदगड येथे आज दि. ३१ रोजी मरगुबाई मंदिर समोर सकाळी १० वा. साखळी उपोषणास सुरुवात केली. या उपोषणाच्या पहिल्या दिवशी प्रा. नागेंद्र कृष्णा जाधव व संदीप अर्जुन भोगण …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन

  वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास कोल्हापूर: कथा, कविता, चित्रपट, नाटक, पथनाट्य, समीक्षा, संशोधनपर लेखन आदी क्षेत्रांत आपली छाप उमटवणारे साहित्यिक-कार्यकर्ते प्रा. राजा शिरगुप्पे यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कामगार चळवळ ते समाजकारण ते साहित्यिक असा त्याचा प्रवास राहिला असून त्यांच्या …

Read More »

“शाहू” कागलची एकरक्कमी एफआरपी रूपये 3100 रुपये जाहीर

  उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांची माहिती कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफआरपी रू. 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर करणे येत आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे …

Read More »

‘लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 2023″ हा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर

  ५ नोव्हेंबर रोजी दिला जाणार हा पहिलाच मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार कागल (प्रतिनिधी) : मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील “हेमलकसा” सारख्या दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक गरज म्हणून गेली 50 वर्षे आदिवासी जनतेला आणि वंचित व उपेक्षित घटकांना अखंडित सामाजिक सेवा देणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांना यावर्षीच नव्याने सुरू केलेला …

Read More »

1 नोव्हेंबरच्या मूक मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो शिवसैनिक सहभागी होणार

  कोल्हापूर : एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. त्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकांवर अन्याय झालेला आहे. गेल्या 67 वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत …

Read More »

मराठा आरक्षणाला पाठबळ देण्यासाठी देवरवाडी येथे कँडल मोर्चा

  शिनोळी : मराठा आरक्षण कायमस्वरुपी व तत्काळ मिळावे या न्याय मागणीसाठी मराठा क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी आज दि. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी देवरवाडी ता.चंदगड सायं. ८ वा कँडल मोर्चा काढण्यात आला. गावातील मराठा बांधवांनी संपूर्ण गावभर फिरून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती केली. “मनोज जरांगे -पाटील …

Read More »

कोनेवाडी फाट्यावर कारने दोघांना उडवले; प्राध्यापकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

  तेऊरवाडी (एस के पाटील) : पर्यटनासाठी जाणाऱ्या चारचाकी कारने बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर कोनेवाडी (ता. चंदगड ) फाट्यानजीक दोन दुचाकीना उडवले यामध्ये चंदगड येथील श्री रवळनाथ ज्यूनिअर कॉलेज चंदगड येथे अध्यापन करणारे प्रा. सतिश सिताराम शिंदे (वय ३५) मुळ गाव कोनेवाडी ता. चंदगड सध्या राहणार यशवंत नगर यांचा जागीच …

Read More »

राजू शेट्टींच्या ‘आक्रोश’ यात्रेचा धसका, कोल्हापुरात चार साखर कारखान्यांकडून ऊसाला विनाकपात दर देण्याची घोषणा!

  कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या ऊस हंगामातील चारशे रुपये दिल्याशिवाय चालू हंगामात ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही असा गर्भित इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आक्रोश पदयात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगला धसका घेतल्याचे दिसत आहे. राजू शेट्टी यांनी उसाच्या कांडाला हात …

Read More »

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

  नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी …

Read More »

शववाहिकेचा गुटख्याच्या अवैध वाहतूकीसाठी वापर

  कागलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस : ४ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव- पंचताराकित एमआयडीसी रोडवर संशयितरित्या शववाहिका आढळून आली. शववाहिकेची तपासणी केली असता यात अवैधरीत्या गुटखा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. या शववाहिकेवर कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा, पान मसाला …

Read More »