Tuesday , June 2 2026
Breaking News

कोल्हापूर : बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून 8 जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश

Spread the love

 

शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहेत. शिरोळ तालुक्यातील बस्तवड गावालाही चौहेबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. अशातच गावाला होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. या ट्रॅक्टरमधून 8 जण प्रवास करीत होते. त्याचवेळी बस्तवड – अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *