नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. आज (दि. १) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बोर्ड परीक्षांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत आज (दि. १) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बारावीची बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या बैठकीत सीबीएसईचे अध्यक्ष यांच्यासमवेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि प्रकाश जावडेकर हेदेखील उपस्थित होते.
बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. कोरोना दरम्यान मुलांवर ताण ठेवणे योग्य नाही. असे सांगितले जात आहे की जेव्हा परीक्षा घेण्यात येईल तेव्हा त्याबद्दल पालकांना माहिती दिली जाईल. विरोधी पक्ष परीक्षा रद्द करण्याबाबत सतत आवाज उठवत होता. दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनीही आज ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली.
