Sunday , September 8 2024
Breaking News

तुर्केवाडी येथील अमन शेखने पटकावले सुवर्णपदक

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय मिशन ऑलिम्पिक खेल संघ द्वारा मध्य प्रदेश येथील उजैन येथे घेण्यात आलेल्या चौथ्या नॅशनल चॅम्पियनशिप 2021 ऑगस्टमध्ये कबड्डी या खेळ प्रकारात
तुर्केवाडी तालुका चंदगड येथील अमन सलाउद्दीन शेख याने सुवर्णपदक प्राप्त करून तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजविलेबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.
त्याचबरोबर अमनला याचठिकाणी अवॉर्ड ऑफ हॉनरने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत अमन शेख याने जिल्हा स्तरिय ऑलिम्पिक खेल 2020 मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.
2020चे राज्यस्तरिय चॅम्पियन, नॅशनल ऑलिम्पिक खेल 2021 (गोवा) या ठिकाणी त्याने सुवर्णपदक पटकावले असून नॅशनल ऑलिम्पिक खेल 2021 चा नंबर एकचा कॉर्नर पटकावला आहे.
तर इंडिया कप 2021 दिल्ली (हरयानाचा) सर्वश्रेष्ठ सहभागी खेळाडू ठरला आहे.
यासाठी अमनला सौरभ पाटील, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले असून वडील सलाउद्दीन, आई सौ. राबिया, बहीण महेक, आजी खैरून, मामा शमशोदिन यांची प्रेरणा मिळाली असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनची बैठक संपन्न

Spread the love  चंदगड : चंदगड तालुका विश्वकर्मा कामगार युनियनच्या वतीने आज बैठक तांबुळवाडी कार्यालयामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *