Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने चंदगडच्या पत्रकाराना रेनकोटांचे वाटप

Spread the love

चंदगड (एस. के. पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदगड पत्रकारांना तालुक्यातील मनसेचे कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे, जिल्हाध्यक्ष
नागेश चौगुले यांच्या पुढाकाराने छत्र्यांचे व रेनकोटांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील यांनी पत्रकार हा वेळी अवेळी वृतसंकलनासाठी बाहेर पडत असतो. प्रसंगी तो प्रकृतीकडे दुर्लक्ष करतो. म्हणून पत्रकाराची वृत सकलन करण्यासाठी मोठी धडपड असते. त्या प्रमाणात त्यांना सोयी सवलती मिळत नसल्याचे सांगितले तर पत्रकारांनी शोधून काढलेल्या विषयावर अंदोलने करून बरेच विषय मार्गी लावल्याचेही नागेश चौगुले यानी सांगितले. यावेळी पत्रकार विजयकुमार दळवी व सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुकाध्यक्ष अमृत परशराम मळवीकर, गावडे, तुकाराम पाटील, विक्रम तानगावडे, नितीन राऊत, सुजित देसाई, जोतीबा करटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार अभिजीत जोशिलकर यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील

Spread the love  चंदगड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *