Tuesday , March 3 2026
Breaking News

अलाबादेवी येथे दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अलाबादेवी (ता. चंदगड) या
गावातील मेहनती शेतकरी सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यूमूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची बैल जोड या दुदैवी प्रसंगात गेली त्या सुरेश यांना या घटनेचा खुप मोठा आघात झाला आहे. शेतकऱ्याचे जिवाभावाचे सोबती त्याची बैलजोड असते आणि सुरेश यांना आज आपली बैल जोड गमवावी लागली. खरचं मन हेलावून टाकणारा असा हा प्रसंग आहे. यामुळे सुरेशचे अंदाजे 70 ते 80 हजारचे नुकसान झाले आहे. परत पुन्हा अशी बैलजोडी कशी घ्यायची आणि शेतीची कामे कशी करायची हा प्रश्न सुरेश समोर उभा आहे? या धक्क्यातून सावरायला ग्रामस्थानी एकसंघ त्यांच्या सोबत राहून बैल खरेदी करण्यासाठी काय करता येतं का हे पाहण्याची गरज आहे.

About Belgaum Varta

Check Also

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सावंत भोसले तर उपाध्यक्षपदी राहूल पाटील

Spread the love  चंदगड : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *