बेळगाव : संततदार पावसामुळे वर्षा पर्यटनाला ऊत आला आहे. निसर्गरम्य ठिकाणच्या धबधब्या जवळ पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी बेळगाव -सावंतवाडी मार्गावरील आंबोली घाटात पर्यटकांची एकच गर्दी उसळली. वाहनांची मोठी रिघ पाहायला मिळाली. वाहनांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच तळीराम पर्यटकांच्या हूल्लडबाजीमुळे ट्रॅफिक जामच्या समस्येत भर पडली. ट्राफिक जाम, तळीरामांची हूल्लडबाजी यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या असंख्य पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले.
Belgaum Varta Belgaum Varta