Tuesday , March 3 2026
Breaking News

चंदगडमधील १८ते ५९ वयोगटातील नागरिकांनी बूस्टर डोसचा लाभ घ्यावा : तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोमजाळ

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्य चंदगड तालुक्यामध्ये आज दि. १५ जुलै पासून तिसरा बुस्टर डोस देण्यात येत असल्याची माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी दिली.
आज दि. १५ जूलै पासून ते ३० सप्टेंबर पर्यंत हा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. यामध्ये १८ ते ५९ वयापर्यंतच्या सर्वाना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६० वर्ष वयोगटावरील ही सर्वाना बूस्टर डोस देण्यात येत आहे. या बूस्टर डोससाठी ज्यानी दुसरा घेऊन ६ महिने झाले आहेत अशा १९ ते ५९ वर्ष वयोगटातील व्यक्ती पात्र असणार आहेत. त्याचबरोबर हा बूस्टर डोस चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामिण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच गावामध्ये पण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या बूस्टर डोसचा लाभ संबंधित नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे व चंदगड तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *