
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अडकूर (ता. चंदगड) येथील श्रीमती सखुबाई मारूती बामणे (वय ६५) या वृद्धेचे घर कोसळून ५ लाखांचे नुकसान झाले तर सुदैवाने हि निराधार वृद्धा या दुर्घटनेत सुदैवाने वाचली.
अधिक माहिती अशी की, श्रीमती सखुबाई बामणे यांचे अडकूर बाजारपेठेत राहते घर आहे. पूर्णपणे निराधार असलेल्या सखुबाई या घरात एकट्याच रहातात. काल रात्री ११ वाजता हे घर पडले. पण या झोपलेल्या सखुबाई सुदैवाने बचावल्या. पण अल्पभूधारक असणाऱ्या सखूबाईचे संपूर्ण घरच उध्वस्थ झाल्याने आता आधाराची गरज मिर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta