चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते.
चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील मुख्यमंत्री शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चूकीची बातमी संबंधीत पत्रकाराने वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या चुकीच्या बातमीमुळे संतप्त झाले. यापूर्वीही याच पत्रकाराने आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात चूकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही एका जि. प. सदस्याने याच पत्रकाराची चुकीच्या बातमीबाबत कानउघडणी केली होती. पण पुन्हा अशीच चूक झाल्याने कार्यकर्ते संतप्त होऊन या पत्रकाराचा व वृत्ताचा जाहिर निषेध केला. विशेष म्हणजे शनिवारी आमदार राजेश पाटील यांनी कुदनूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची बैठक घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाढीसंदर्भात सखोल चर्चा केली आणि लगेच असे चूकीचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने संभ्रम निर्माण झाला. एकंदरीत या वृत्ताने चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत.