Wednesday , March 4 2026
Breaking News

कोदाळीच्या सुभेदार मेजर रमेश गावडे यांना राष्ट्रपतींकडून ऑनररी लेफ्टनंट रैंक

Spread the love

 

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सुभेदार मेजर रमेश धानू गावडे सेवा निवृत्त ( Indian Army) गाव कोदाळी (चंदगड)
याना आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती Suprem Commander of Armed Forces याच्याकडून या 15 ऑगस्ट 2022 रोजी ऑनररी लेफ्टनंट रैंक जाहीर केली आहे. हा ऑनर चंदगडमधील कोदाळी सारख्या दुर्गम भागातील एका सैन्यदलाच्या निवृत्त जवानाला मिळाल्याने चंदगडवासीयांना आनंद झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज चंदगड आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सुभेदार मेजर रमेश गावडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह सर्व विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव यांना राज्यस्तरीय समाजभूषण

Spread the love  चंदगड : दैनिक परतगंगा संचलित, आज की तेज खबर न्यूज चैनल मार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *