तेऊरवाडी (एस. के. पाटील) : विद्या मंदिर बोंजुर्डी (ता. चंदगड) या शाळेत कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या चिमूकल्यानी पर्यावरण पूरक शेडूच्या गणेश मूर्ती तयार करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.
गणेश उत्सव सण हा सर्व चिमुकल्यापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचाच आवडीचा. पण या सणाची सर्वाधिक आतुरता असते ती चिमूकल्याना. आपला लाडका बाप्पा बघण्यासाठी या बाल विद्यार्थ्यांचे मन आसूसलेले असते. पण याच बाप्पाची पर्यावरण पूरक शेडू मातीची मूर्ती बनवण्याचा सर्वाधिक आनंद विद्या मंदिर बोंजूर्डीच्या या विद्यार्थ्यानी घेतला. कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत मुलाना गणेश मूर्ती बनविन्याचे प्रात्यक्षिक शाळेतील शिक्षिका श्रीमती ज्योतिका पाटील यांनी विद्यार्थ्याना दिले. स्वतः शाडू मातीची मूर्ती विद्यार्थ्याना करून दाखवली. तसे या पद्धतीनेच विद्यार्थ्यानिही गणेशाला आपल्या नाजूक हातातून सुंदररित्या साकारले. आपल्या हातातील चिखलातून गणेश मूर्ती तयार करताना सर्वच मूलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून जात होता. यासाठी अडकूर केंद्राचे केंद्रप्रमुख शावेर फर्नाडीस, शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. सोनजया देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. यात विशेष म्हणजे 1 ली व दुसरीच्या मुलांनी बनवलेल्या मुर्त्यासुद्धा खूपच आकर्षक झाल्या आहेत. सर्वच बालचमूनी तन, मन अन बाप्पाविषयी श्रद्धा मनात ठेवून गणेशाला साकार केल्याने या सर्व बाल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती ज्योतिका पाटील व मुख्याध्यापिका सौ. देसाई यांचे अडकूर केंद्रात सर्वत्र कौतूक केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta