शिनोळी (प्रतिनिधी) : शिनोळी बु. ता. चंदगड ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा, असे निवेदन ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असता सरपंच नितीन पाटील यांनी चौकशीला सामोरे जावू असे सांगत आपण चाळीस वर्षानंतर खूप परिवर्तन केले आहे. अशी फुशारकी मारली आहे. हिम्मत असेल तर सरपंचानी आमच्या प्रश्नाची उत्तरे पेपरमध्ये जाहीर करा असे प्रती आवाहन ग्रामस्थांनी केल्याने संरपंच याला उत्तर देणार काय? असा प्रश्न निर्माम झाला आहे.
४० वर्षात कधी झाली नव्हती एवढी दुरावस्था गावच्या रस्त्याची झाली आहे. वर्षात साधा खड्डा मुजवला आहे का? आणि निवडणूक तोंडावर आल्यावर गावच्या लोकांना विश्वासात न घेता फक्त ७० लोकांच्या सह्यांनी ८० लाखाचे काम ऐन पावसात सुरु करत आहेत हे योग्य आहे का? आमचा विरोध कदापीही रस्त्याला नाही. पावसात रस्ता आणि गटारी बांधकामाची गुणवत्ता राहील का? ५ वर्ष झाली एक गाव एकच कंत्राटदार का? गावच्या चारही अंगणवाडी भाडोत्री खोलीत का? प्राथमिक शाळेचे दोन वर्ग मंदिरात का बसतात? ग्रामपंचायत कार्यालय हायटेक करण्यापेक्षा शैक्षणिक सुविधा का पुरवल्या नाहीत? प्राथमिक शाळेचा मुलभूत विषय म्हणजे शिक्षिकांसाठी व मुलींसाठी स्वच्छतागृह आहे का? चार वर्षाचे मागासवर्गीयांचे अनुदान वाटले आहे का? शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आपल्या गावासाठी प्रस्थावित असताना शेजारच्या गावात का गेले? जि. प. सदस्य अरुण सुतार यांनी १५ लाखाचे रस्ते, हायमास्क दिवा, शाळा दुरुस्तीसाठी निधी असे एकूण २० लाखाचे विकासकामे गावासाठी केली आहेत. ५ लाखाचे लाईट बिल थकीत का? गावातील सर्व मोहरी बांधल्या मग सार्वजनिक वाचनालय जवळील मोहरी का बांधली नाही? ऍटलास कंपनीने स्वच्छतेसाठी दिलेले ७० बॅरेल व कोरोना रुग्णासाठी दिलेल्या गाद्या कुठे आहेत? ग्रामपंचायत निवडणूक समोर आहे पाहून राजकीय कुटील डाव करत लोकांची दिशाभूल करून पारदर्शी असणाऱ्या संस्थाच्या निवडणूक लावायच्या आणि गावात वैमनस्य निर्माण करायचे एवढाच मनसुभा दिसतोय. दहा वर्षापूर्वी जमलेल्या देवस्थान जमिनीच्या ६ लाखाच्या करातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ३० लाखाचे कल्मेश्वर मंदिर उभा केले आहे. आपण सत्तेवर आल्यावर अजूनही स्थानिक देवस्थान कमिटी का नेमली नाही? या ५ वर्षातील जमीन लिलावातून मिळालेला गावचा ५ लाखाचा कर स्वतः सरपंच आणि उपसरपंच यांनी आपल्या स्वतःच्या खासगी खात्यावर ठेवून त्याचा उपयोग स्वतःच्या आणि राजकीय कामासाठी वापरत आहेत. आपण या निधीतून गावचे एकादे मंदिर का बांधले नाही. गावची देवस्थान कमिटी नेमा मी जमाखर्च लेखी तपशील देवस्थान कमिटी अध्यक्ष खजिनदार यांच्याकडे सुपूर्द करतो व ०९/०९/२०१ ९ च्या ग्रामसभेत जमा खर्च तपशील १५.० लोकांच्या समक्ष जाहीर केला होता. मग गेली ४ वर्ष आपण मुगगिळून गप्पा का बसला होता? गावचे सरपंच यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीच्या देणगीदारांची नावे, जमा – खर्च तपशील जाहीर करावा, असे आवाहन रवींद्र रेडेकर यांनी केले आहे. सरपंचानी चार वर्षात खूप विकासकामे केली असती तर शेवटच्या घटकेला समाजमंदिर, गावाअंतर्गतचा रस्ता आणि शाळा खोली निव्वळ राजकीय हेतूने कामे सुरु केली आहेत. हे जग जाहीर आहे. वाढवलेला उत्पन्न कर हे कोणासाठी लावला हा प्रश्न अनुत्तरीत असून अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सरपंच नितीन पाटील यांनी देण्याचे आवाहन शिनोळी ग्रामनी निवेदनाद्वारे केले आहे. या निवेदनावर दयानंद रेडेकर, नागेश मेणशे, नामदेव
बोकमूरकर, मोनापा पाटील, शेखर पाटील आदि ग्रामस्थांच्या सह्या आहेत.